news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

टीम लोकमन by टीम लोकमन
February 5, 2026
in सांस्कृतिक
0
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

टीम लोकमन मंगळवेढा |

स्नेहसंमेलन म्हणजे कलाविष्कार, स्नेहसंमेलन म्हणजे सुप्त गुणांचे प्रदर्शन, स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद देणारा सोहळा…शाळेच्या मुलांना स्नेहसंमेलनाची एक वेगळीच ओढ आणि आवड असते. म्हणून सर्वच विद्यालयांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते.

उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार दिनांक 2 व मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, ऐतिहासिक परंपरा व संस्कृती निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मंगळवेढा नगरीच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनंदा बबनराव आवताडे, प्रशालेचे विश्वस्त व राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे पब्लिक इमेज डायरेक्टर व एल.एम.सी. मेंबर सोमनाथ इंगळे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. ओंकार कुलकर्णी, प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार, स्कूल कॅप्टन राज सोनवले व व्हाईस कॅप्टन जिया सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने झाली. प्राध्यापक कल्पेश कांबळे व त्यांच्या चिमुकल्या टीमने स्वागतगीताने सर्व अतिथींचे स्वागत केले. सर्व अतिथींचा प्रशालेकडून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांनी केले. दरवर्षी दिला जाणाऱा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार यावर्षी इयत्ता नववीतील आयुष्मान लक्ष्मण नागणे व सायली समाधान पाटील यांना उपस्थित अतिथींच्या हस्ते देण्यात आला.

नंतर हाऊस चॅम्पियनशिपची घोषणा करण्यात आली. रेड हाऊसला शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी “चॅम्पियनशिप” ट्रॉफी मिळाली. प्रमुख पाहुण्यांनी रेड हाऊसच्या कर्णधारांचा ट्रॉफी देऊन गौरव केला. नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रशालेला वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.नंदकुमार शिंदे यांनी प्रशालेची भविष्यात असलेली ध्येय पालकांसमोर व्यक्त केली व विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये विविधता आढळून आली. त्यामध्ये छावा थीम, नरसिम्हा थीम, गोरा कुंभार थीम, धनगर थीम, फॅमिली थीम, बंजारा लोकनृत्य, बॉलीवूड रिमिक्स, देशभक्तीपर नृत्य, पंजाबी नृत्य, मोबाईलचे दुष्परिणाम थीम डान्स, ऑपरेशन सिंदूर, लेझीम डान्स, लगान थीम, बाहुबली,भूले बिसरे गीत, देवीचा गोंधळ, धर्मेंद्र थीम डान्स अशा विविध थीम विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमाला पालकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभला. पालकांनी विद्यार्थ्यांवर व शालेय व्यवस्थापनावर कौतुकाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे विश्वस्त डॉ. नंदकुमार शिंदे व डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

Next Post

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group