news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

लोकशाहीच्या उत्सवात युवकांची प्रशासनाला साथ ; मतदान केंद्रावर अंध, अपंग, निरक्षर व दिव्यांगांना दिला मदतीचा हात

टीम लोकमन by टीम लोकमन
May 10, 2024
in सांगण्याजोगे
0
लोकशाहीच्या उत्सवात युवकांची प्रशासनाला साथ ; मतदान केंद्रावर अंध, अपंग, निरक्षर व दिव्यांगांना दिला मदतीचा हात

न्यूज लोकमन मंगळवेढा |

सोलापूर लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत मंगळवेढा तालुक्यात भोसे, नंदेश्वर, लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी, सजावट, मतदारांचे स्वागत करणे, मतदान खोलीपर्यंत मतदारांना पोहचविणे आदी कामांमध्ये मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी लोकशाही उत्सवाच्या कामांमध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये युवकांनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले.

सोलापूर लोकसभा निवडणूकीसाठी मंगळवेढा तालुक्यात भोसे, नंदेश्वर, लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा या चार मतदान केंद्रावर मतदारांना आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये सुरू आहे हे समजण्यामध्ये अडचण व गोंधळ होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली होती. या मतदान केंद्रावर दिशादर्शक फलक तयार केले होते आणि मतदारांना प्रत्यक्ष मतदान खोलीपर्यंत पोहचविण्यासाठी मंगळवेढ्यातील श्री.संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी यांना स्वयंसेवक म्हणून मदतीला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.आणि या कामामध्येही विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले.

या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी निळा, हिरवा, पांढरा, गुलाबी अशा रंगाचे टीशर्ट घातले होते. या केंद्रावरील मतदारांच्या स्वागतासाठी रांगोळी, सजावट, मतदारांचे स्वागत करणे या कामामध्ये चांगली मदत केली. सदर कामांमध्ये मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लोकशाही उत्सवाच्या कामामध्ये पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढविण्यामध्ये भावी पिढी असणाऱ्या युवक व युवतींनी आपला खारीचा वाटा उचलल्याचे दिसून आले. विशेषतः मतदान केंद्रावरील वयस्कर, अपंग, निरक्षर, रुग्ण आदी मतदारांना त्यांची मतदार स्लिप बघून केंद्रातील खोलीकडे पोहच करण्याच्या व्यवस्थेसाठी चांगली मदत झाली.

यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव ,नायब तहसीलदार (निवडणूक) जयश्री स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी डी.एस.इंगोले , पुरवठा अधिकारी हणमंत पाटील, तलाठी दिनेश सोनवणे, अनुजा मलगोंडे, प्रणाली कुरणे, मंडल अधिकारी श्यामबाला कुंभार,  कोतवाल जरग यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सर्व नोडल अधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा यांनी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न केले तसेच मतदान केंद्रावर मतदारांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला.

मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर जास्त बुथ असल्यामुळे आपले मतदान कोणत्या खोलीमध्ये आहे हे समजत नव्हते पण विद्यार्थी स्वयंसेवक मदतीला आल्यामुळे मला मतदान अगदी वेळेत करता आले.
विश्वास माने, मतदार

Previous Post

सोने खरेदीसाठी अमोल रत्नपारखी ज्वेलर्समध्ये अक्षय्यतृतीया शुभमुहूर्त ऑफर्स उपलब्ध ; खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद

Next Post

आमदार समाधान आवताडे व शिवसेना तालुकाप्रमुख येताळा भगत राजकीय मतभेद बाजूला सारत रंगले मनमोकळ्या गप्पांच्या फडात ; दोघांमधील हितगुजाने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group