टीम लोकमन मंगळवेढा |
सद्य स्थितीत व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटलेल्या तरुणांना आज खऱ्या अर्थाने संतांच्या विचारांची गरज आहे असे मत युवा भारूडकार संदीप मोहिते यांनी व्यक्त केले. ते मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील जुगलबंदी भारुडातून समाज प्रबोधन करीत होते.
कार्यक्रमाचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे यांच्या हस्ते व जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी संदीप मोहिते आणि आण्णा चव्हाण यांनी जुगलबंदी भारूडातून प्रत्येकांनी आपल्या जीवनात नेहमी सत्य बोलून चांगले आचरण ठेवावे, आई वडिल हेच आपले खरी तीर्थक्षेत्रे आहेत, धन श्रीमंती पेक्षा माणुसकीची श्रीमंती जपणे आवश्यक आहे. अनिष्ट रूढी व परंपरेत न अडकता विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवणे गरजचे आहे. युवकांनी कोणतेही व्यसन न करता छत्रपतींचे विचार आत्मसात करावेत अशा अनेक सामाजिक प्रश्नांना स्पर्श करीत जुगलबंदी भारूडातून संताच्या विचारांचा जागर करून समाज प्रबोधन करण्यात आले.
यावेळी महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रशांत गायकवाड, ॲड दत्तात्रय तोडकरी, जमीर सुतार, विशाल जाधव, सूर्यकांत तोडकरी, संजय जगताप, बसवेश्वर माळी, शिवाजी कोंडूभैरी, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे व हर्षद डोरले यांचेसह मोठ्या संख्येने श्रोतावर्ग व शिवभक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर माजी अध्यक्ष प्रा. विनायक कलुबर्मे यांनी आभार मानले.