news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सांगण्याजोगे ! स्मशानभूमीत संसार थाटून मृतदेहाची सेवा करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड यांचा सन्मान ; स्मशानभूमीत महिला दिन साजरा करीत मंगळवेढ्याच्या वारी परिवाराने समाजासमोर ठेवला नवा आदर्श

टीम लोकमन by टीम लोकमन
March 8, 2025
in सांगण्याजोगे
0
सांगण्याजोगे ! स्मशानभूमीत संसार थाटून मृतदेहाची सेवा करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड यांचा सन्मान ; स्मशानभूमीत महिला दिन साजरा करीत मंगळवेढ्याच्या वारी परिवाराने समाजासमोर ठेवला नवा आदर्श

टीम लोकमन मंगळवेढा |

देशभरात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झालेला असताना मंगळवेढ्यात मात्र वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. उच्च शिक्षित असून सुद्धा मंगळवेढ्याच्या स्मशानभूमीत आपल्या पतीबरोबर गुण्यागोविंदाने आणि तितक्याच धाडसाने संसार करणाऱ्या अनुराधा शिवराज उप्पेवाड यांचा वारी परिवाराच्या वतीने साडी, चोळी, फेटा, सन्मानचिन्ह, मिठाई व पुस्तके देऊन कर्तृत्ववान व धाडशी महिला म्हणून सुवर्णा मुळीक यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

आज स्मशानभूमी म्हटल्यावर आपल्याला खूप भीती वाटते तसेच अनेक रूढी, अंधश्रद्धा मनात निर्माण होतात परंतु या सर्व गोष्टींना छेद देत समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपले आयुष्य खर्च करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड खरोखरंच आदर्शवत व प्रेरणादायी आहेत. आजच्या युगात उच्च शिक्षित असूनसुद्धा अनुराधाताईनीं स्मशान भूमीत संसार थाटला आहे रात्री, अपरात्री केव्हाही स्मशानभूमीत अंत्यविधी साठी मानवी देह येतात तरी देखील न घाबरता ती सुद्धा एक प्रकारची मानवसेवा आहे असे समजून आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे त्या उभ्या आहेत. तसेच स्मशानभूमीची स्वच्छता ठेवण्यात कार्यरत आहेत.

आज कर्ता माणूस घरात नसला की स्वतःच्या घरात महिलांना भीती वाटते. पण एक महिला स्मशानभूमीत वास्तव्यास असणे हे वाखाणण्याजोगे आहे. खरंतर प्रेरणा एखाद्या व्यक्तीकडून नाही तर त्यांनी केलेल्या कामातून घ्यायची असते. प्रत्येक महिला प्रसिद्ध होतेच असे नाही. आपण आपल्या आजुबाजूला पाहिल्यावर लक्षात येईल कि आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच महिला आहेत. ज्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या नाहीत पण त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरच काही आहे आणि हेच ओळखून वारी परिवाराने स्मशानजोगी म्हणून काम करणाऱ्या अनुराधा उप्पेवाड यांचा गौरव करून खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला आहे.

यावेळी अनुराधा यांना त्यांच्या कामाबद्दल विचारले असता त्यानी सांगितले की स्मशानातील अंत्यविधीचे काम सुद्धा एक प्रकारची ईश्वरसेवाच आहे स्मशानात आलेल्या मृतदेहाची भीती वाटत नाही. मोठया बंगल्यातच संसार होतो असे नाही तर स्मशानभूमीत सुद्धा संसाराचा गाढा चालवीता येतो. त्यासाठी एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते. आत्तापर्यंत असा माझा सन्मान कोणी केला नव्हता उलट आमच्या कामाची दखल घेऊन महिला दिनानिमित्त एका महिलेचा सन्मान तोही स्मशानभूमीत येऊन केल्याबद्दल वारी परिवाराचे त्यांनी आभार मानले.

यावेळी प्रकाश मुळीक यांनीही स्त्री शक्तीचा जागर घालीत उप्पेवाड कुटुंबाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सासरे सुभाष उप्पेवाड, पती शिवराज उप्पेवाड, गोरक्ष गायकवाड, विलासराव आवताडे, रामचंद्र दत्तू, बाळासाहेब जाधव, मदन पाटील, पांडुरंग नागणे, रविकिरण जाधव, रतिलाल दत्तू, चंद्रकांत चेळेकर, प्रफुल्ल सोमदळे, अजय आदाटे, स्वप्निल टेकाळे, सिद्धेश्वर डोंगरे, विजय हजारे, अरुण गुंगे, सतिश दत्तू आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. विनायक कलुबर्मे यांनी केले.

Previous Post

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‌जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

मंगळवेढा येथील नगरपालिका कन्या शाळा क्रमांक 1 येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post
मंगळवेढा येथील नगरपालिका कन्या शाळा क्रमांक 1 येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

मंगळवेढा येथील नगरपालिका कन्या शाळा क्रमांक 1 येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group