टीम लोकमन मंगळवेढा |
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर एम. एस. आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यु.पी.देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती मंगळवेढा तसेच विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर मंगळवेढा येथे श्रीमती. एस. एन. गंगवाल-शाह, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगळवेढा यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक न्यायदिवस व जागतिक लेाकसंख्या दिन साजरा करण्यात आला.
जागतिक अंतरराष्ट्रीय न्याय दिवस बाबत श्रीमती व्ही. के. पाटील सह दिवाणी न्यायाधीश यांनी मार्गदर्शन केले. तसेच जागतिक लाेकसंख्या दिनाबाबत सरकारी वकिल डि.ए.बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास एस. आर. रामदास सहा.अधिक्षक, श्रीमती. ए. डी. उत्पात नाझर, तालुका विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर, सरकारी वकिल आर. एल. बामणे, विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड. यु. डी. माने, सचिव ॲड. जे.डी. मुल्ला, सरकारी वकिल डी. ए. बनसोडे, ॲड. डि. ए. हजारे, ॲड. एस. टी. लवटे, ॲड. आर. डी. कुलकर्णी, ॲड. पी. एल. पवार, ॲड. एस.आर.पवार, ॲड. डी. एस. माने, ॲड. आर. एस. कोळेकर, ॲड.एम. डी. गायकवाड, ॲड. आर. एस. रणे, ॲड. व्ही. डी. देशमुख, ॲड. सागर टाकणे, ॲड. एस. ए. सावंत, ॲड. एस. जी. जमदाडे, ॲड. सौरभ मोरे, ॲड. श्रीमती. एस. आर. क्षिरसागर, ॲड. श्रीमती. रेखा गोवे, ॲड. श्रीमती. सीमा ढावरे, ॲड. श्रीमती. आर. जी. माने-चाैधरी तसेच इतर विधीज्ञ मंडळी व सदर कार्यक्रमाकरीता न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार मंडळी देखील मोठया संख्येने उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम हा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आला.









