news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

बीड लोकसभेला पराभूत झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर संधी मिळणार ? केंद्रात मंत्रीपदाची मोठी जबाबदारी मिळण्याचीही दाट शक्यता, मुंडेंच्या पुनर्वसनासाठी फडणवीसांचा पुढाकार

टीम लोकमन by टीम लोकमन
June 21, 2024
in राजकीय
0
बीड लोकसभेला पराभूत झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर संधी मिळणार ? केंद्रात मंत्रीपदाची मोठी जबाबदारी मिळण्याचीही दाट शक्यता, मुंडेंच्या पुनर्वसनासाठी फडणवीसांचा पुढाकार

टीम लोकमन मंगळवेढा |

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील वजनदार नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघामध्ये पराभव झाला. पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे त्यांची आता राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली होती.

पण आता या चर्चांना बळ मिळाले आहे. राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तसेच त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात देखील समावेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्याच दिल्लीवारीत अमित शाह यांच्यासोबत यावर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी यापूर्वीही ३ वेळा देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती केली होती. त्यानंतर आताही देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र यावर केंद्रीय नेतृत्वाने पंकजा मुंडे यांनी जनतेतून निवडून यावे असे सांगितले होते. पणलोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला.

या पराभवानंतर संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्रातील ओबीसी समाज दुखावला आहे. पराभवाची कारणे शोधत असताना पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन होणे गरजेचे आहे यावरही दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निकालांपूर्वी आणि आता निकालानंतरही पंकजा मुंडेंसाठी देवेंद्र फडणवीसांचा दिल्लीकडे कायम पाठपुरावा सुरुच आहे. राज्यसभेवर वर्णी लागताच पंकजा मुंडेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातही समावेश होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या गोंधळामध्ये मुंडेंचे राजकीय पुनर्वसन हे महत्वाचे ठरणार आहे.

ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडेंच्या सरकारकडे दोन मागण्या

दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गेल्या 9 दिवसांपासून वडीगोद्री येथे उपोषण सुरू आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि अतुल सावे हे मुंबईला जाणार आहे. त्याठिकाणी लक्ष्मण हाके यांचे शिष्टमंडळ देखील असणार आहे. ओबीसी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे यांची उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना भेटून गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. ‘सत्तेचा गैरवापर करून चुकीची सर्टिफिकेट दिली आहेत का? त्याची चौकशी करावी आणि राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट घ्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी या दोन मागण्या असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Previous Post

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट ; नाथाभाऊ लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार?

Next Post

गुडन्यूज ! राज्य सरकारने केली काश्मीरमध्ये जमीन खरेदी, काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन’ उभारणार ; खरेदी प्रक्रिया पूर्ण, जाणून घ्या किंमत

Next Post
गुडन्यूज ! राज्य सरकारने केली काश्मीरमध्ये जमीन खरेदी, काश्मीरमध्ये ‘महाराष्ट्र सदन’ उभारणार ; खरेदी प्रक्रिया पूर्ण, जाणून घ्या किंमत

गुडन्यूज ! राज्य सरकारने केली काश्मीरमध्ये जमीन खरेदी, काश्मीरमध्ये 'महाराष्ट्र सदन' उभारणार ; खरेदी प्रक्रिया पूर्ण, जाणून घ्या किंमत

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group