टिम लोकमन मंगळवेढा |
मार्च 24 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याचा निकाल 95.25 टक्के लागला असून पुणे विभागाचा निकाल 97.30 टक्के लागला आहे. जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्याने बाजी मारली असून तब्बल 98.11 टक्के इतका निकाल लागला आहे तर सर्वात कमी निकाल शहर दक्षिण व शहर उत्तरचा लागला आहे. त्याची टक्केवारी 94.55 इतकी आहे.
सोलापूर जिल्ह्यात 66238 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 35515 मुले तर 30156 मुली असे 65671 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामध्ये 33315 मुले तर 29237 मुली असे एकूण 62552 विद्यार्थी पास झाले आहेत. मुलींच्या पास होण्याचा टक्का हा 96.95 तर मुलांचा 93.8 टक्का असून जिल्ह्याचा निकाल हा 95.25 टक्के लागला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा निकाल पुढीलप्रमाणे, अक्कलकोट 96.48, बार्शी 96.19, करमाळा 95.92, माढा 96.06, माळशिरस 97.00, मंगळवेढा 98.11, मोहोळ 97.54, पंढरपूर 95.04, सोलापूर शहर उत्तर व दक्षिण 94.55, सांगोला 97.37
सोलापूर जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेश क्षमतेची आकडेवारी पाहिली असता विज्ञान शाखा 32600, वाणिज्य शाखा 23500 व कला शाखेच्या जागा या 17000 आहेत. एकूण पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रवेश जागा जास्तचं आहेत.










