news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

विधानसभेला उपरा उमेदवार आम्हाला नकोच, जत मधील भाजप कार्यकर्त्यांची भूमिका ; तमनगौडा रवीपाटलांच्या उमेदवारीसाठी भाजप पदाधिकारी आग्रही

भाजपाचे विधानपरिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकरांना नवा मतदारसंघ शोधावा लागणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
May 25, 2024
in राजकीय
0
विधानसभेला उपरा उमेदवार आम्हाला नकोच, जत मधील भाजप कार्यकर्त्यांची भूमिका ; तमनगौडा रवीपाटलांच्या उमेदवारीसाठी भाजप पदाधिकारी आग्रही

माडग्याळ : नेताजी खरात

भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाचे संचालक तम्मनगौडा रवीपाटील हेच भाजपचे आमदारकीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, अशी भूमिका जत तालुक्यातील भाजपचे विविध नेते व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मांडली.

लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक मंडळी लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील भाजपच्या विविध नेते पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील भाजप वार रूममध्ये झाली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे, जत नगरपालिकेचे माजी सभापती टीमुभाई एडके, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, भाजप शेतकरी आघाडीचे प्रमुख हणमंत गडदे, राजू पुजारी, आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजावर, कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव, जाडरबोबलादचे उपसरपंच प्रकाश काटे आदी उपस्थित होते.

निवृत्ती शिंदे म्हणाले की, जत तालुक्याला उच्चशिक्षित अभ्यासू व गल्लीपासून दिल्लीपर्यंत वजन असलेला नेता तम्मनगौडा रवीपाटील यांच्यासारखा आमदार गरजेचा आहे. रवीपाटील यांच्याकडे कोणतीही सत्तेची सूत्रे हातात नसताना थेट केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाच्या संचालक पदापर्यंत झेप घेतली आहे. जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी दमदार पाऊल टाकले आहे. आता जत तालुक्यावरील ऊस तोडणी मजुरांचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी जत तालुक्याचा कृषी व औद्योगिक विकास करण्याचा संकल्प तम्मनगौडा रवीपाटील यांनी केला आहे. तालुक्यातील बेरोजगारी हटविण्याची धमक एकाच नेत्यांत आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

टीमुभाई एडके म्हणाले की, एक बहुजन समाजातील नेता, लिंगायत समाजाचा प्रतिनिधी म्हणून जत तालुक्यातील तळागाळापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला आहे. जत शहरातील रस्ते, गटारी, सभामंडप यासाठी मोठा निधी दिला आहे. जत शहराचा पुढील ३५ वर्षांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तम्मनगौडा रवीपाटील प्रयत्नशील आहेत. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगोदरच रवि पाटील यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे.

बसवराज पाटील म्हणाले, जत तालुक्यात भाजपचे अनेक गट असताना, विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पक्षांची विस्कटलेली घडी बसविली. राज्यातील पहिली वार रूम स्थापन केली. वार रूंमच्या माध्यमातून तालुक्यात जोरदार पक्ष बांधणी केली आहे. मोदी @९ व नमो चषक केवळ तम्मनगौडा रवीपाटील यांच्यामुळे यशस्वी झाले व जत तालुक्यातील प्रत्येक घरोघरी हा उपक्रम पोहोचला. आता कोणी बाहेरच्यांनी जत तालुक्यात लुडबुड करू नये.

संजय गडदे म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 30 कोटी रुपये खर्चाचा बेदाणा प्रकल्प जत तालुक्यातील बालगाव येथे उभारला आहे. अंकलगी पाणी योजनेसारखी तीस कोटी रुपयांची महत्त्वकांक्षा पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला गती येण्याच्यादृष्टीने व टेंडर निघण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केंद्रीय मार्ग निधी तून अनेक रस्त्यांना केंद्र सरकारचा निधी मिळवून दिला आहे् जत नगरपालिका, विविध पाणीपुरवठा योजना, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा खोल्या अशी चौफेर कामे केली आहेत.

Previous Post

आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधनांचा बादशहा काळाच्या पडद्याआड ; विको कंपनीचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे निधन

Next Post

नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी राज्यभरातून तब्बल 58 हजार अर्ज ; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नर्सिंगची भुरळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

November 6, 2025
तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

October 27, 2025
आज मंगळवेढा येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. विक्रम काळे यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ ; माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांची प्रमुख उपस्थिती

October 2, 2025
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

September 25, 2025
कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

September 23, 2025
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

सांगोला शहरानजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी ; मजुरीच्या कामासाठी जात असताना काळाचा घाला

September 22, 2025
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group