टीम लोकमन मंगळवेढा |
फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेज यांचेवतीने जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे यांच्या हस्ते फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली.
मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे होते. यावेळी फिजिशियन डॉ. मनीष बसंतवाणी, अस्थिरोग तज्ञ डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य शरदिनी काळे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा महिंद्रकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पुष्पांजली शिंदे म्हणाल्या, १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून पाळला जातो. १८८४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणारी आद्यपरिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक सुश्रुषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेसने १९६५ पासून हा दिवस साजरा केला आहे. जानेवारी १९७४ मध्ये १२ मे हा दिवस साजरा करण्यासाठी निवडण्यात आला. कारण हा दिवस आधुनिक नरसिंगच्या संस्थापक फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जयंती दिवस आहे. दरवर्षी आयसीएन आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनी किट तयार आणि वितरित करते. किटमध्ये सर्व परिचारिकांच्या वापरासाठी शैक्षणिक आणि सार्वजनिक माहिती सामग्री असते. नर्सिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करून यशस्वी व्हायचे असेल तर फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करा.
यावेळी डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. मनीष बसंतवाणी, डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, प्राचार्य शरदिनी काळे, व्यवस्थापक भारत शिंदे, जगदीश सुतार, धनश्री बनसोडे, मयुरी क्षीरसागर, साक्षी पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मंगळवेढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक भारत शिंदे, मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, पॅथॉलॉजी विभागाचे दशरथ फरकंडे, संतोष कोळसे, प्रवीण पवार, सोमनाथ हेगडे, गुरुनाथ शिवशरण, गणेश कोरे, चेतन माने, रूपाली कुंभार, संतोष बाबर, नितीन घाटुळे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कांचन करे, सविता गाढवे, कोमल गोरड, शुभांगी कांबळे, ज्योती चव्हाण, आशा पाटोळे, प्रणिती ढावरे, सुवर्णा पुजारी, सिद्धार्थ सर्वगोड, प्रद्युम्न ढगे, सुनील कर्वे, राकेश देसाई, निंगाप्पा परगोंडे, शिवम जाधव, धनश्री बनसोडे, रंजना माने, वर्षा भोरकडे, दिपाली वाघमारे, गजानन गवळी, दर्शनी कोळी, अनिशा शेख, पूनम बंडगर, दिपाली वाघमारे, रंजना कांबळे, दिपाली चव्हाण, शालू कुशाळकर, रूपाली कुशाळकर, गीता काडे, मयुरी क्षीरसागर, सृष्टी कापसे, नम्रता सातपुते, स्वाती लोखंडे, वैशाली अवघडे, रूपाली खडतरे, किरण जाधव, मालती बनसोडे, प्रणाली होवाळे, कल्याणी खडतरे, प्रवीण पवार, एकनाथ हेगडे, नागनाथ गेजगे, आकाश ढोबळे, प्रथमेश लोखंडे, सत्यजित सोनवले, साक्षी पुजारी, पूजा गवळी, अश्विनी पाटील, विशाखा शिवशरण, गुरुनाथ कुंभार, शिवम्मा रताळकर, प्रतीक बनसोडे, रोहन भोसले, विनोद पाटील, अश्विनी पाटील, गीता खाडे, रूपाली साळुंखे, ऐश्वर्या बनसोडे, अर्पिता भोरकडे, विद्या राऊत, लक्ष्मी जाधव यांचेसह संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश सुतार, माधवी पवार, दरिबा खिलारे यांचेसह संत कान्होपात्रा नर्सिंग कॉलेजचा कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी पवार यांनी केले तर जगदीश सुतार यांनी आभार मानले.










