टीम लोकमन मंगळवेढा |
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दिनांक 1 मे ते रविवार दिनांक 4 मे 2025 या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.सुजीत कदम यांनी दिली.
गुरुवार दिनांक 1 मे रोजी दुपारी 4.30 वा. दलितमित्र स्व.कदम गुरुजींच्या पुतळयाचे पूजन व सर्व शाखांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण, अमृत महोत्सव लोगो अनावरण कार्यक्रम आमदार समाधान आवताडे यांच्याहस्ते व उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, उदयोगपती पवनभैय्या महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयीन प्रदेश सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, राष्ट्रवादीचे नेते अजीत जगताप, प्रदिप खांडेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड.सुजीत कदम, डॉ. सुभाष कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सायंकाळी 6.30 वा. शिवशंभो महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त श्रीमती चंदाताई तिवाडी यांचे भारूड आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 2 मे रोजी मंगळवेढा मायनिंग प्रा.लि. मंगळवेढा या कार्यालयाचे उदघाटन व डॉ.माणिकराव साळुंखे यांच्या विज्ञान दिवस भाषणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन पुणेचे उदयोगपती प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते व शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार राम नेहरवे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. सकाळी 7 वाजता स्व.कदम गुरुजी स्मारक ते स्व.ताड आप्पा मळा या मार्गावर कृषी -क्रीडा ज्योत दौड काढण्यात येईल. सायंकाळी 4.00 वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांच्या हस्ते होईल. सायंकाळी 6.30 वा. होणार्या कवी संमेलनाचे उदघाटन तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते होत असून अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका प्रा. तेजस्विनी कदम स्विकारतील. सदरच्या कवीसंमेलनामध्ये आबेद शेख, गुंजन पाटील, इंद्रजित घुले, शिवाजी सातपुते, तालीब सोलापुरी, शिवाजी बंडगर आदींचा सहभाग आहे.
शनिवार दिनांक 3 मे रोजी सकाळी 9.30 वाजता शिक्षणतज्ञ डॉ. ह. ना. जगताप यांचे 21 व्या शतकातील शिक्षकांची दिशा या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी 6.30 वाजता आनंदाच्या वाटा या विषयावर डॉ. संजय कळमकर यांचे व्याख्यान होईल. रविवार दिनांक 4 मे रोजी सकाळी 9.00 वाजता मंगळवेढयातील समस्त भजनी मंडळांचा हनुमान भजनी मंडळ आंबेचिंचोली व स्पंदन अॅकेडमी बेगमपूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.00 स्व. दलितमित्र कदम गुरुजी यांच्या पुतळयावर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.30 वाजता महाप्रसाद होईल. दुपारी 2.00 वाजता संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचा सत्कार समारंभ व आदर्श शिक्षक शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे.
सदरच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. सुजीत कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, संचालिका डॉ. मिनाक्षी कदम, सचिवा डॉ. प्रियदर्शनी महाडिक, उपप्राचार्या तेजस्विनी कदम, सहसचिव श्रीधर भोसले, संचालिका अजिता भोसले, खजिनदार राम नेहरवे, संचालक अॅड. शिवाजी पाटील, यतिराज वाकळे, ए.डी.भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली दलितमित्र कदम गुरुजी शास्त्र महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. गायकवाड, दलितमित्र कदम गुरुजी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आय. जाधव, इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य आर. एस. काशिद, वेळापूरचे प्राचार्य आर. बी. पवार, बेगमपूरचे प्राचार्य के. सी. भोसले, भोसेचे प्राचार्य जयराम आलदर, नरखेडचे मुख्याध्यापक अजित शिंदे, आंबेचिंचोलीचे मुख्याध्यापक एस. व्ही. बाबर, उपमुख्याध्यापक एस. एम. नागणे, वेळापूरचे उपमुख्याध्यापक पी. एम. शिवशरण, पर्यवेक्षक सुहास माने, डी. जे. चंदनशिवे, बी. एस. सावळे, व्ही. बी. फुगारे, एल. एच. ओमने, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी, संस्था परिवार परिश्रम घेत आहेत.