news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सोशल मिडीयाचा वापर कमीत कमी करावा : पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे ; स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूव्ह 2K25 ’ हा तांत्रिक उपक्रम संपन्न

टीम लोकमन by टीम लोकमन
April 6, 2025
in शैक्षणिक
0
सोशल मिडीयाचा वापर कमीत कमी करावा : पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे ; स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूव्ह 2K25 ’ हा तांत्रिक उपक्रम संपन्न

टीम लोकमन पंढरपूर |

‘सोशल मिडीया हा आपसात संवाद वाढविण्यासाठी असून सध्या याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे आणि यामुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ कामापुरताच करावा. अनोळखी व्यक्तीशी ओळख वाढवू नये, त्याला कोणतीही माहिती देवू नये. अनोळखी व्यक्तीला ओटीपी देवू नये तसेच कोणत्याही मोहाला बळी पडू नये, आपले डाक्युमेंटस् अकारण कुणालाही शेअर करू नयेत अथवा पोस्ट करू नयेत. अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल मिडीयाचा वापर कमीत कमी करावा.’ असे आवाहन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी केले.

गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये आयोजिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूव्ह 2K25’ या एकदिवशीय तांत्रिक संशोधनपर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे हे मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात आयकॉनचे उपाध्यक्ष ओम गाढवे यांनी ‘चक्रव्यूव्ह 2K25’ या तांत्रिक स्पर्धेचे स्वरूप, नियमावली, सहभागी विद्यार्थ्यांना व विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे स्वरूप या संबंधित बाबी स्पष्ट केल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार यांनी ‘संशोधन आणि तंत्रज्ञान’ याबद्धल सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना प्रमुख पाहुणे उपनिरीक्षक विक्रम वडणे म्हणाले की, ‘सध्या होतकरू युवकांची देशाला गरज असून अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम आदी संबंधित शंका विचारल्या असता उपनिरीक्षक वडणे यांनी समर्पक उत्तरे दिली.

यामध्ये ‘चक्रव्यूव्ह 2K25’ या राज्यस्तरीय स्पर्धेत कोडींग इव्हेंट्स मध्ये इतर राज्यातील कॉलेजच्या विद्यार्थी- स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना एकूण रोख 26 हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपपत्र अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयकॉन प्रतिनिधी अथर्व माळवदे यांच्यासह विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. समन्वयक म्हणून प्रा. पी. डी. माने व प्रा. के. आय. चव्हाण यांनी काम पाहिले. या उपक्रमात महाराष्ट्र व आसपासच्या राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून जवळपास 420 विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला.

यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. एस. पी. पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. के.बी. पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. विद्यार्थिनी सचिवा सोनाली करवीर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Previous Post

धक्कादायक ! आयसीयू मध्ये उपचार सुरू असलेल्या अल्पवयीन तरुणीवर पोलिसाचा अत्याचार ; ‘या’ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पोलीस दलात खळबळ

Next Post

सोनी तालुका मिरज येथील इंदुमती जगन्नाथ जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post
सोनी तालुका मिरज येथील इंदुमती जगन्नाथ जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन

सोनी तालुका मिरज येथील इंदुमती जगन्नाथ जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group