टीम लोकमन मरवडे |
मंगळवेढा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या तसेच तालुक्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या मरवडे गावच्या सरपंचपदी गावविकास आघाडीच्या सदस्या सौ. मीनाक्षी सिद्धेश्वर सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या मरवडे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, नामदेव गायकवाड सर, नामदेव घुले, दत्तात्रय गणपाटील, श्रीकांत गणपाटील, संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील गावविकास आघाडीने मोठे यश मिळवत सत्ता स्थापन केली. उच्चशिक्षित, उमदे, तरुण तडफदार व संयमी नेतृत्व असलेल्या नितीन घुले या तरुणाला सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर गावविकास आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सुमन गणपाटील, पुनम मासाळ व अंजना चौधरी या महिलांना देखील सरपंचपदावर विराजमान होऊन तालुक्यातील बहुचर्चित अशा विकसनशील मरवडे ग्रामपंचायतीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या सर्वांनीच आपापल्या क्षमतेनुसार व कौशल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालवत मरवडे गावाच्या विकासात भर घालण्याचा प्रयत्न केला.
मरवडे ग्रामपंचायतीवर गावविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून गेल्या साडेचार वर्षात 6 कोटींपेक्षा अधिक विकासकामे पूर्ण करण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने प्रकाशित केलेल्या माहिती पुस्तिकेत सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मरवडे ग्रामपंचायतीत महिलाराज असल्याचे संपूर्ण तालुक्याने पाहिले आहे. सुमन गणपाटील, पुनम मासाळ, अंजना चौधरी या सरपंचपदी विराजमान होत्या तर दीक्षा शिवशरण या उच्चशिक्षित तरुणीने दीर्घकाळ उपसरपंचपद सांभाळले. तसेच ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून राखी जाधव या महिला अधिकाऱ्याने मरवडे सारख्या तालुक्यातील संवेदनशील सतर्क आणि दक्ष नागरिक असलेल्या मरवडे गावचे उत्तम आणि यशस्वी सारथ्य केले.
मरवडेच्या सरपंच अंजना चौधरी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी आज मरवडे ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच पदासाठी मीनाक्षी सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी प्रतिभा घुगे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित सरपंच मीनाक्षी सूर्यवंशी यांनी यापूर्वी मरवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच म्हणून अतिशय उत्तम कामकाज केले आहे. मरवडे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून सूर्यवंशी परिवारातील सदस्याला पहिल्यांदाच सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण सूर्यवंशी कुटुंबात आज मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सूर्यवंशी परिवारातील तरुणांनी मोठ्या जल्लोषात या निवडीचे स्वागत केले.
गावविकास आघाडीचे मार्गदर्शक मरवडे विकास सोसायटीचे माजी चेअरमन नामदेव गायकवाड व नामदेव घुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लतीफभाई तांबोळी, दत्तात्रय गणपाटील, श्रीकांत गणपाटील, संदीप सूर्यवंशी, माजी उपसरपंच रेश्मा शिवशरण, दीक्षा शिवशरण, विद्यमान उपसरपंच मिरा जाधव यांनी नूतन सरपंच मीनाक्षी सूर्यवंशी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन घुले, मरवडे विकास सोसायटीचे माजी चेअरमन नामदेव घुले, सुनील गायकवाड सर, बापूराव सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, पैलवान दामोदर घुले, युवराज सूर्यवंशी, पांडुरंग जाधव, दत्तात्रय सूर्यवंशी, परमेश्वर सूर्यवंशी, सिद्धेश्वर सूर्यवंशी, माजी उपसरपंच हैदर केंगार, शिवाजी सूर्यवंशी, अनिल गणपाटील, संभाजी सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते निलेश स्वामी, प्रशांत सूर्यवंशी, राजू सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, अश्विन शिवशरण, सुभाष शिवशरण, अनुप सूर्यवंशी, विक्रमसिंह पवार, समाधान सूर्यवंशी, अमोल लांडगे यांचेसह मरवडे ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.