news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींचा भीषण अपघात ; युवकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

टीम लोकमन by टीम लोकमन
May 14, 2024
in क्राईम
0
काळाचा घाला ! अखेर तिचा उपचारादरम्यान झाला मृत्यू

टीम लोकमन सोलापूर |

सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला तर दुसरा युवक गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हा भीषण अपघात आज सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडला. अभिषेक केगनाडे वय २१ वर्षे रा. देगाव असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव असून या अपघातात गंभीर जखमी झालेला सुदर्शन काळे हा सुद्धा देगाव येथीलच रहिवासी. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाकडे टीव्हीएस गाडी होती. महामार्गाच्या मध्ये असलेल्या डिव्हायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलार लॅम्पला संबंधित युवकाचे डोके धडकले आणि जबर मार लागून तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

तर दुसरा युवक अतिवेगाने असल्याने त्याची गाडी अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो सुद्धा गाडीवरून उडून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला. जखमी युवकाला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली. हा अपघात होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी अपघात स्थळी भेट दिली. या ठिकाणी देगाव मधील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. त्या युवकाच्या मृत्यूबद्दल देगाव गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

लक्ष्मीदहिवडी येथील ध्येय क्रांती वाचनालयास तालुका पशुधन अधिकारी डॉ. सुहास सलगर यांचे कडून खुर्च्या भेट

Next Post

वर्दीला काळीमा ! अखेर ‘त्या’ दोघा पोलिसांचे निलंबन, ‘तिची’ छेड काढणे त्या दोन पोलिसांना पडले महागात ; पोलीस दलात खळबळ

Next Post
वर्दीला काळीमा ! अखेर ‘त्या’ दोघा पोलिसांचे निलंबन, ‘तिची’ छेड काढणे त्या दोन पोलिसांना पडले महागात ; पोलीस दलात खळबळ

वर्दीला काळीमा ! अखेर 'त्या' दोघा पोलिसांचे निलंबन, 'तिची' छेड काढणे त्या दोन पोलिसांना पडले महागात ; पोलीस दलात खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group