मंगळवेढा : अबोली बने
उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशाला म्हणजे मंगळवेढा तालुक्यातील एक प्रसिद्ध व नावाजलेले शैक्षणिक संकुल होय. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील प्रशालेत ‘फ्युजन 2k24 आर्ट डे’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे कार्यक्रम 27 व 28 सप्टेंबर या दिवशी घेण्यात आले.
या आर्ट डे मध्ये विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन केले होते त्यामध्ये फॅन्सी ड्रेस, आर्ट एक्जीबिशन, फूड स्टॉल, सोलो डान्स, सोलो सिंगिंग, इन्स्ट्रुमेंटल प्लेइंग, फनी गेम्स, क्ले मेकिंग व ड्रॉइंग, स्टोरी टेलिंग, राईम्स अशा विविध स्पर्धा व उपक्रम होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य लेखाधिकारी सोमनाथ इंगळे, मराठी टीव्ही सिरीयल अभिनेता सुनील सूर्यवंशी, मारुती केंगार, यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या दिवशी सोलो सिंगिंग व फॅन्सी ड्रेस यासाठी परीक्षक म्हणून अजय देशपांडे व मनीषा महालकरी यांनी काम पाहिले. तर दुसऱ्या दिवशी सोलो डान्स व इन्स्ट्रुमेंटल प्लेइंग यासाठी परीक्षक म्हणून हर्षद अत्तार, बापूसाहेब पवार, लक्ष्मी मोगले,विद्यागौरी अकोलकर, वैशाली कलुबर्मे यांनी काम पाहिले. दोन्ही दिवशी कार्यक्रमाची सुरवात नटराज मूर्ती पूजनाने व दीपप्रज्वलाने करण्यात आली. त्यानंतर अतिथींचा यथोचित सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
दोन दिवसीय कार्यक्रमातील विविध स्पर्धा हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी लावलेले फूड स्टॉल यामुळे उपस्थित पालकांना व सर्वांना विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील व्यवसाय केल्याचा वेगळाच आनंद मिळाला.
सोलो डान्स, फॅन्सी ड्रेस यामधील विविध वेशभूषेतील छोट्या विद्यार्थ्यांनी व वैविध्यपूर्ण गाण्यांनी उपस्थित सर्वांची मने जिंकून घेतली. विविध फनी गेम्सनी धकाधकीच्या व व्यस्त असलेल्या जीवन शैलीतून पालकांनी व विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळण्याचा आनंद घेतला. उपस्थित अतिथी व सर्वांनीच विद्यार्थ्यांचे आणि प्रशालेचे कौतुक केले. भावी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या.
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. प्रशालेचे प्राचार्य सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम शिस्तबद्ध वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.