news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

आजचा शुक्रवार अपघातवार ! आज राज्यात झालेल्या 2 विचित्र अपघातांमध्ये 12 जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती ; कुठे झाल्या या दुर्घटना?

टीम लोकमन by टीम लोकमन
January 17, 2025
in ताज्या घडामोडी
0
आजचा शुक्रवार अपघातवार ! आज राज्यात झालेल्या 2 विचित्र अपघातांमध्ये 12 जण ठार तर अनेक जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती ; कुठे झाल्या या दुर्घटना?

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्यात आजचा शुक्रवार हा अपघात ठरला आहे. पुण्याजवळ घडलेल्या दोन विचित्र दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात झाला असून त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.

तर दुसरा अपघात हा आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर झाला असून त्यात 3 जण ठार झाले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मक्झिमो गाडी आणि एसटी बसमध्ये विचित्र अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला जाऊन धडकला त्यामुळे मॅक्झिमो ही गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसच्या मध्ये मॅक्झिमो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यामधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यातील 6 प्रवासी जागीच मृत झाले. चार गंभीर जखमींवर नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तर दुसरा अपघात हा जेजुरीजवळ घडला आहे. आळंदी पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाट्याजवळ एसटी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार झाले. रमेश किसन मेमाणे ( वय 60), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय 40), पांडुरंग दामोदर मेमाणे (वय 65) हे अशी मृतांची नावे असून ते तिघेही बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे, ता. पुरंदर जि. पुणे येथील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सासवड जेजुरी रस्त्यावर बेलसर फाटा दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. दुचाकीवर असणारे तिघेजण रस्ता क्रॉस करून जात असताना एसटी बस व दुचाकीचा अपघात झाला. ही घटना काल दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली आहे.

एसटी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी बसखाली गेल्याने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकी वरील तिघेजण जखमी झाले. तिघांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिघांचा मृत्यू झाला. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.

मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

या दोन्ही अपघातांचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त करत अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या. असे निर्देशही पुणे पोलिस अधीक्षकांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

Previous Post

मोठी बातमी ! ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा धक्का, ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; उद्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणार प्रवेश, राज्याच्या राजकारणात खळबळ

Next Post

40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे प्रबंधक सुरेश पाटील, लिपिक विशाल चव्हाण, अमित महांगडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Next Post
मोठी बातमी ! कामाची बिले अदा करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल ; संपूर्ण तालुक्यात खळबळ

40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे प्रबंधक सुरेश पाटील, लिपिक विशाल चव्हाण, अमित महांगडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group