news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

आज भालेवाडी येथे संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे ‘महिला व बालकांचे आरोग्य : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान

टीम लोकमन by टीम लोकमन
January 23, 2026
in सामाजिक
0
आज भालेवाडी येथे संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा व सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे ‘महिला व बालकांचे आरोग्य : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान

टीम लोकमन मरवडे |

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दबदबा निर्माण केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरांतर्गत आज संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा, मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या चेअरमन व सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक तथा श्री संत दामाजी महाविद्यालयाचे अधिव्याख्याते प्रा. डॉ. सुधाकर राठोड यांनी दिली.

युवा सरपंच डॉ. श्रीकांत दवले यांच्या नेतृत्वात भालेवाडी गावाचा कायापालट होत असून अनेक विकासकामे गावात झाल्याने भालेवाडी गावची वाटचाल समृद्धीकडे सुरू आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी असलेले 5 कोटी रुपयांचे बक्षीस भालेवाडी गावाला मिळवायचेच या इराद्याने संपूर्ण गाव एकवटला आहे. दुर्लक्षित असलेले भालेवाडी गाव आता सोलापूर जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले आहे. गावाला अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सिनेअभिनेते, अभिनेत्री आणि सेलिब्रिटी देखील भेट देत आहेत.

मंगळवेढा येथील संत दामाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर भालेवाडी येथे सुरू असून या श्रमसंस्कार शिबिरांतर्गत आज शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी मंगळवेढा येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ. पुष्पांजली शिंदे यांचे महिला व बालकांचे आरोग्य आव्हाने आणि उपाय या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अण्णा मारुती दवले स्वीकारणार आहेत.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास खोमणे, शशांक गवळी, भाऊसाहेब तेली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेवाडीचे मुख्याध्यापक तानाजी कळकुंबे, मथुरा कोळी, सुनीता पवार, उषा जामगुंड, पल्लवी कांबळे, रेखा गवळी, सीमा गवळी, नर्मदा शिवशरण, साधना काळुंखे, बलवान वाकडे, नम्रता काटकर, मनीषा गवळी, केशव गवळी, तुळशीराम घाडगे, मायप्पा येडे, केरप्पा गवळी, श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय शिवशरण, प्रा. सरिता भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राजाराम पवार, प्रा. डॉ. जावेद तांबोळी, प्रा. डॉ. सुधाकर राठोड यांचेसह संत दामाजी महाविद्यालयातील प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

Previous Post

बोराळे पंचायत समिती गणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युवक नेते अक्षय पवार यांच्या मातोश्री अलका पवार यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

Next Post

आदर्श मॅरेज ! माजी आमदारांनी आपल्या लाडक्या कन्येचा विवाह केला केवळ 150 रुपयांत आणि लाखोंची गुरुदक्षिणा केली विनाअनुदानित शिक्षकांसाठी समर्पित ; दत्तात्रय सावंत यांच्या निर्णयाचे राज्यभरातून होतेय कौतुक

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group