नंदुर : एकनाथ हेगडे
नंदुर ता. मंगळवेढा येथील अतिशय लहान, कन्नड भाषिक आणि कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या गावातील तिहा हैदर मुलाणी हिने राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत १४० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे.
तिहा हिला राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत १५० पैकी १४० गुण मिळाले आहेत. ती मंगळवेढा येथील नगरपालिकेच्या कै. नानासाहेब नागणे प्रशालेची विद्यार्थिनी आहे. तिहा हिने मंथन सोबतच राज्यस्तरीय अभिरुची परीक्षेमध्ये १५० पैकी १३८ गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी आली आहे. तसेच NSSE या परीक्षेत देखील २०० पैकी १७२ गुण मिळवून केंद्रात दहावी येण्याचा मान मिळवला आहे. तिहाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
तिला कै. नानासाहेब नागणे प्रशाला नागणेवाडी, मंगळवेढा या प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश आवताडे, वर्गशिक्षक अर्जुन आ, मीनाक्षी मांडवे यांचे मार्गदर्शन लाभले. तिहाच्या यशाबद्दल नंदुरच्या सरपंच सुमन गोडसे, चनबसु येणपे, रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हनुमंत वगरे, पर्यवेक्षक हनुमंत केंदुळे, आण्णासाहेब जाधव, युवराज पाटील, महावीर कांबळे, राजकुमार मेहेर, संजय मोरे, आप्पा दोलतडे, मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, माजी सरपंच श्रीमंत म्हेत्रे, दामू कांबळे, माजी सैनिक बुरान मुलाणी, माजी सैनिक संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष मल्लय्या स्वामी, माजी सैनिक संघटनेचे मंगळवेढा तालुका सचिव चंगेजखान इनामदार, रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचे अध्यक्ष अमोल रत्नपारखी, पैलवान प्रवीण पवार आदींनी तिचे अभिनंदन केले.









