news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

लोकसभेच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार ; राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात ? महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

टीम लोकमन by टीम लोकमन
June 2, 2024
in राजकीय
0
विधानसभेला उपरा उमेदवार आम्हाला नकोच, जत मधील भाजप कार्यकर्त्यांची भूमिका ; तमनगौडा रवीपाटलांच्या उमेदवारीसाठी भाजप पदाधिकारी आग्रही

टीम लोकमन मंगळवेढा |

लोकसभा निडवणूकीच्या निकालानंतर भाजप पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते राज्य पातळीपर्यंत मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचा कार्यकाळ 6 जून रोजी संपणार आहे. यामुळे भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. देशभरातून अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यात महाराष्ट्रात राज्यातील या नेत्याचे नाव पण आघाडीवर असल्याचे समजते.

जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपणार

लोकसभेचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ 6 जूनला संपणार आहे. त्यानंतर संघटनात्मकदृष्ट्या पक्षात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र राज्यातील नेते विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे सुद्धा समोर येत आहेत. महाराष्ट्र राज्यातील भाजप संघटनेत सुद्धा मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अध्यक्ष बदलला जातो अथवा त्याला मुदत वाढ मिळते…

भाजपातंर्गत दर तीन वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जातो किंवा अध्यक्षांना पुन्हा संधी दिली जाते. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ गेल्यावर्षी जून महिन्यात संपला होता. परंतु त्यावेळी त्यांना एक वर्षांची मुदत वाढ देण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीच्या पक्ष घटनेनुसार अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येते. त्यामुळे 4 जूनच्या निकालापूर्वी अथवा नंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होऊ शकते आणि त्या नावाची घोषणा होऊ शकते.

राज्यातील भाजप नेते विनोद तावडे यांचे नाव पण राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर राज्यात नेतृत्व बदलाची शक्यताही वर्तवली जात आहे. यानंतर मात्र राज्यात तावडे पॅटर्न चालणार हे निश्चित.

Previous Post

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी

Next Post

कशी काळाची चाहूल आली…! मंगळवेढ्यातील सायकलप्रेमी तरुण उद्योजक सुहास ताड यांचा अपघाती मृत्यू ; जागतिक सायकल दिनादिवशीच झालेल्या दुर्दैवी घटनेने मंगळवेढा परिसरात हळहळ

Next Post
कशी काळाची चाहूल आली…! मंगळवेढ्यातील सायकलप्रेमी तरुण उद्योजक सुहास ताड यांचा अपघाती मृत्यू ; जागतिक सायकल दिनादिवशीच झालेल्या दुर्दैवी घटनेने मंगळवेढा परिसरात हळहळ

कशी काळाची चाहूल आली...! मंगळवेढ्यातील सायकलप्रेमी तरुण उद्योजक सुहास ताड यांचा अपघाती मृत्यू ; जागतिक सायकल दिनादिवशीच झालेल्या दुर्दैवी घटनेने मंगळवेढा परिसरात हळहळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group