news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

…..तर सर्व पदांचा त्याग करून 100 टक्के राजकारणातून संन्यास घेणार, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांची सर्वात मोठी घोषणा ; काय आहे कारण?

टीम लोकमन by टीम लोकमन
July 28, 2024
in राजकीय
0
…..तर सर्व पदांचा त्याग करून 100 टक्के राजकारणातून संन्यास घेणार, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांची सर्वात मोठी घोषणा ; काय आहे कारण?

टीम लोकमन मंगळवेढा |

आरक्षणाला जर धक्का लागेल तर नक्कीच मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. पदावर आणि राजकारणात राहण्याला कोणताही अर्थ नाही. म्हणूनच मी त्याग करेल. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.

या देशात आरक्षण हे संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत उगीचच अपप्रचार एवढा झालाय की त्यामुळे लोकं बळी पडलेत. पण आता लोकांच्या लक्षात आलेले आहे. आणि आमच्यासारखे अनेक जे कोणी संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत ते असे होऊ देणार नाहीत असे स्पष्ट वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यावर आमचे सरकार ठाम…

काँग्रेस, आमची पूर्वीची राष्ट्रवादी आणि सर्वच पक्ष हे अनेक वर्ष सत्तेत राहिले. त्यांनी काहीच केले नाही. निवडणुकीच्या काळात आरक्षणाचा मुद्दा विरोधक पुढे करत असल्याची टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. आमचे सरकार ठाम आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला, कायदा पण बनला आहे. आणि दहा टक्के आरक्षण दिले आहे. आता ज्यांना तेही पटत नाही ते विरोधाभास करत आहेत.

मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे. ज्यांच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे खंबीर नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत. अनेक पक्षात राहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिले. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची. कारण ते स्वतः देऊ शकले नाही. आणि आता चुका काढत बसायचे. एकच मुद्दा आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करायचा हा एकच मुद्दा बनल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांवर केली.

राज्यात महायुतीचेच सरकार पुन्हा येणार

महाराष्ट्रात तिन्ही पक्ष महायुती म्हणून काम करत आहोत आणि यशस्वीरीतीने या महाराष्ट्रमध्ये निवडणूकमध्ये सामोरे जाणार आहोत. महाराष्ट्रमध्ये आपले सरकार बनवणार असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले. अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांनी अधिक बोलण्याचे टाळले.

Previous Post

पैशांच्या देवाण घेवाणीतून गळा दाबून केला खून त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकले, पंधरा महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा पोलिसांकडून अखेर उलगडा ; आरोपी जेरबंद, सांगोला व सोलापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Next Post

लखपती दीदी ! महिलांना व्यवसायासाठी आता मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ; 9 कोटींपेक्षा अधिक महिलांनी घेतला या योजनेचा लाभ, केंद्र सरकारची लखपती दीदी योजना नक्की आहे तरी काय?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group