news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मंगळवेढ्याच्या वारी परिवाराने मंगळवेढा ते माचणूर पाणी वाचवा जनजागृती सायकल रॅली काढत साजरा केला जागतिक जलदिन ; ‘पाणी बचाव’ चा नारा देत केली जनजागृती

टीम लोकमन by टीम लोकमन
March 22, 2026
in सामाजिक
0
मंगळवेढ्याच्या वारी परिवाराने मंगळवेढा ते माचणूर पाणी वाचवा जनजागृती सायकल रॅली काढत साजरा केला जागतिक जलदिन ; ‘पाणी बचाव’ चा नारा देत केली जनजागृती

टीम लोकमन मंगळवेढा |

पाणी हे अमूल्य जीवन आहे पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे म्हणून जागतिक जलदिनाचे औचित्य साधून मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने मंगळवेढा-माचणूर-मंगळवेढा 30 किलोमीटर सायकल रॅली काढून पाणी बचावचा नारा देत जनजागृती केली.

सद्या ऐन उन्हाळ्यात लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात, भांडी स्वच्छ केले जातात, अंघोळीसाठी शॉवरचा वापर करतात, पाईप सुरु ठेवून गाडी धुतात त्यामुळे खूप पाणी वाया जाते आणि दुसरीकडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी, पक्षी मरण पावतात पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार म्हणूनच सायकल रॅलीतून पाणी अडवा पाणी जिरवा, तुम्ही पाणी वाचवा पाणी तुम्हांला वाचवेल, जल है तो कल है, पाणी वाचवा जीवन वाचवा, नदी स्वच्छ ठेवा पर्यावरनाचे रक्षण करा. असा नारा देत जनजागृती केली.

तसेच सर्वत्र कडक उन्हाळा जाणवू लागला आहे त्यामुळे मानवाबरोबर पशु पक्षांना उन्हाच्या झळा असह्य हाऊ लागल्या आहेत त्यामुळे घरट्यातील पिल्ले पाण्यावाचून जीव सोडीत आहेत. पाण्यासाठी पक्षांना दूरवरती भटकावे लागत आहे. वाढत्या उन्हात पक्षांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमी व नागरिकांनी घराच्या अंगणात, झाडावरती, गच्चीवरती किंवा जिथे शक्य असेल तिथे पक्षांना पाणी आणि चारा ठेवून पक्षी संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन देखील माचणूरच्या रॅलीत लोकांना करण्यात आले.

तसेच सायकल चालवा इंधनाची बचत करा, नदीची स्वच्छता ठेवा व पर्यावरणाचे रक्षण करा असा प्रबोधनाचा जागर घालण्यात आला खरोखरचं वारी परिवार सायकल क्लबने हाती घेतलेल्या पाणी व पक्षी बचाव उपक्रमाचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे. यावेळी जनजागृती रॅलीत सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे, रुजुता शहा, रिदम शहा, राहुल सांवंजी, अविनाश जाधव, प्रफुल्ल सोमदळे, सचिन साळुंखे, गणेश मोरे, सिद्धेश्वर डोंगरे, प्रा. महेश अलिगावे, भारत नागणे, यश महामुनी, समर्थ महामुनी, डॉ. राहुल शेजाळ, रतिलाल दत्तू, नागेश डोंगरे, दत्ता जाधव, चंद्रजीत शहा, नंदकुमार नागणे, कमलेश माळी, चंद्रकांत चेळेकर, प्रा. विनायक कलुबर्मे आदी सहभागी होते. यावेळी दत्तात्रय आसबे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous Post

भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात शिवसेनेतील बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाची चौकशी, SIT च्या संशयाची सुई आता राजकीय नेत्यांकडे ; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील बडा मासा गळाला लागणार?

Next Post

मोठी बातमी ! दुचाकीला वाचवण्याच्या नादात स्विफ्ट डिझायर कार व मिनी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार तर 8 जण जखमी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group