news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मुंडेंची वाट काटेरीच ! बीडचा झाला आहेच, धाराशिवचा बिहार करू नका, मंत्री धनंजय मुंडे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नकोच ; मुंडेंच्या पालकमंत्रीपदाला धाराशिवकरांचाही विरोध

टीम लोकमन by टीम लोकमन
January 8, 2025
in ताज्या घडामोडी
0
मुंडेंची वाट काटेरीच ! बीडचा झाला आहेच, धाराशिवचा बिहार करू नका, मंत्री धनंजय मुंडे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नकोच ; मुंडेंच्या पालकमंत्रीपदाला धाराशिवकरांचाही विरोध

टीम लोकमन मंगळवेढा |

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणासह खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याचेसह 4 आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्यामुळेच बीडचे पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट होणार आहे.

पण राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना शेजारीच असलेल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा आहे. पण मराठा संघटनांनी धनंजय मुंडेंच्या पालकमंत्रिपदाला विरोध केला आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देऊ नये यासाठी मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध करत आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. ‘बीडचा बिहार झाला, धाराशिवचा बिहार नको’ असे म्हणत धनंजय मुंडे यांना धाराशिवचे पालकमंत्री पद देऊ नका. असे म्हणत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांचेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी आणि त्यांना मदत करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी. अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करु नये. बीडचा बिहार झाला असून धाराशिवचा बिहार करू नये. त्यासाठी आम्ही मुंडे यांच्या नावाला विरोध करत असल्याचं मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे, बीड हे धाराशिवला लागूनच आहे. बीडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे महायुती सरकारने धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद देण्यास रेड सिग्नल दिला आहे. पण त्यांचे नाव धाराशिवसाठी चर्चेत आहे. शेजारीच असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळत असल्यामुळे ही राजकीय सोय तर नाही ना. अशी चर्चाही रंगली आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार?

बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनादेखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात आले आहे. ⁠संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती केली असल्याचे समोर येत आहे.

Previous Post

मोठी बातमी ! बीडमध्ये पोलीस मुख्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याने संपवले जीवन, धक्कादायक घटनेने बीड जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ

Next Post

प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या व प्रश्नांसंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांचेसोबत मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाची बैठक संपन्न : संजय चेळेकर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group