news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

टीम लोकमन by टीम लोकमन
March 29, 2026
in सामाजिक
0
मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

टीम लोकमन मंगळवेढा |

हिरवाईने नटलेली झाड आपल्याला श्वास देत असतात. मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचं अस्तित्व टिकणं हे अत्यंत गरजेचे आहे. झाडांची हिरवाई केवळ वातावरण शुद्ध ठेवत नाही, तर मानवाचे आरोग्य, पावसाचे चक्र आणि संपूर्ण जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आधारस्तंभ ठरते. त्यामुळे झाडे लावणे आणि त्यांची हिरवाई टिकवणे ही काळाची गरज बनली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. झाडाच्या हिरवाईत आपलं भविष्य आहे, म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कवी व वक्ते सुनील जवंजाळ यांनी केले.

पीएम श्री नगरपालिका मुलांची शाळा नंबर-2 या ठिकाणी आयोजित केलेल्या पर्यावरण संवर्धन विषयक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक राजकुमार मांजरे, उपशिक्षक सुनील शिंदे, शिवलिंग राऊत, उत्तम ढगे, स्वप्निल लाळे, शुभांगी जोशी, रिजवाना काझी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख शिवलिंग राऊत यांनी करून दिला.

पुढे बोलताना जवंजाळ म्हणाले की, प्लास्टिकचा वापर कमी करणे हीच स्वच्छ भविष्याची पहिली पायरी आहे.कचरा वेगळा करून टाकल्यास पुनर्वापर सुलभ होतो आणि पर्यावरण वाचते.ओला व सुका कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. एकदा वापरायच्या प्लास्टिकला नकार देणे म्हणजे निसर्गाला दिलेली खरी साथ आहे. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या विनोदी कवितांच्या व प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अतिशय विनोदी शैलीत सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्तम ढगे यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षक सुनील शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.

Previous Post

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group