टीम लोकमन मंगळवेढा |
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत एलिमेंट्री व इंटरमिजिएट मंगळवेढ्यातील उदयसिंह मोहिते-पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेने घवघवीत यश संपादन केले आहे.
या इंटरमिजिएट व एलिमेंट्री परीक्षेमध्ये विद्यालयातील एकूण विद्यार्थी 34 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ‘ए’ श्रेणीत 3 विद्यार्थी, ‘बी’ श्रेणीत 18 विद्यार्थी, ‘सी’ श्रेणीत 13 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
कु. वेदांतिका सचिन जमदाडे, कु. सृष्टी हनुमंत बिरादार, कु. जीया शाकीर सय्यद यांनी ‘ए’ श्रेणी मिळवली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील चित्रकला शिक्षिका रोहिणी आलिगावे व मंगेश केकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल राजपत्रित वैद्यकीय अधिकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. नंदकुमार शिंदे, संत दामाजी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. पुष्पांजली शिंदे, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सुधीर पवार व प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.









