news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सत्तासंघर्षाचा तिढा वाढला ! गृहखाते तर सोडाच पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ‘या’ चार नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप ; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
November 30, 2024
in ताज्या घडामोडी
0
सत्तासंघर्षाचा तिढा वाढला ! गृहखाते तर सोडाच पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ‘या’ चार नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप ; एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

टीम लोकमन मंगळवेढा |

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीला अनपेक्षित असे मोठे यश मिळाले तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला अतिशय मोठा फटका बसला.

विधानसभेच्या निकालानंतर आता येणाऱ्या नव्या सरकारचा शपथविधी नेमका कधी पार पडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी माघार घेत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा मार्ग मोकळा केला असला तरी एकनाथ शिंदे नाराज असल्याची मोठी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृहखात्यासह 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे. ही मागणी तर भाजपने मान्य केली नाहीच मात्र आता शिंदे गटाच्या त्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार व शिंदेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या चार नेत्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याची माहिती मिळत आहे. या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते. आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुसफूस?

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अजूनपर्यंत तरी नाराज केलेले नाही. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, संजय राठोड यांना मंत्रिपद न देणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरु शकते. तानाजी सावंत यांचा कुठल्याही परिस्थितीत मंत्रीमंडळात समावेश झालाच पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

दुसरीकडे भरत गोगावले यांना मंत्रिपदाचे वेध लागले असून त्यांना मंत्रिपद द्यावे लागले तर दीपक केसरकर यांना थांबावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण उदय सामंत आणि दीपक केसरकर हे कोकणातील दोघे मंत्री असताना गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यास ही संख्या तीन होणार आहे. त्यामुळे आता या चार नेत्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरुनही भाजप आणि शिंदे गटात धुसफूस होऊ शकते. आता एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावरच या नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

महायुतीची बैठक पुढे ढकलली…

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात अद्याप समाधानकारक वाटाघाटी न झाल्यामुळे सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. काल महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार होती. परंतु अचानक सातारा जिल्ह्यातील दरे येथे आपल्या मूळ गावी एकनाथ शिंदे निघून गेल्याने कालची बैठक रद्द करण्यात आली.

पुढील दोन दिवस महायुतीची बैठक होणार नसून भाजपच्या गटनेत्याची निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे भाजपकडून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे भाजपने शिंदे गटातील चार नेत्यांच्या मंत्रिमंडळात समावेशाला विरोध दर्शवल्याने वाटाघाटीचा तिढा वाढतच चालला असल्याचे दिसत आहे.

Previous Post

धक्कादायक ! राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस अपघातातील मृतांची संख्या वाढली ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडून शोक व्यक्त

Next Post

मोठी बातमी ! चक्क विजयी उमेदवाराच्या समर्थकांनीच घेतला संशय, नेता जिंकला तरीही कार्यकर्त्यांचा EVM वर आक्षेप ; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात 3 डिसेंबरला होणार बॅलेट पेपरवर मतदान

Next Post
मोठी बातमी ! चक्क विजयी उमेदवाराच्या समर्थकांनीच घेतला संशय, नेता जिंकला तरीही कार्यकर्त्यांचा EVM वर आक्षेप ; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात 3 डिसेंबरला होणार बॅलेट पेपरवर मतदान

मोठी बातमी ! चक्क विजयी उमेदवाराच्या समर्थकांनीच घेतला संशय, नेता जिंकला तरीही कार्यकर्त्यांचा EVM वर आक्षेप ; सोलापूर जिल्ह्यातील 'या' गावात 3 डिसेंबरला होणार बॅलेट पेपरवर मतदान

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group