नांदेड : उज्वला गुरसुडकर
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सतत विजेचा लपंडाव चालू आहे. दिवस असेल किंवा रात्री सध्या जनतेला ह्या प्रकारामुळे अतीशय त्रास सहन करावा लागतो आहे.
म्हणून कंधारचे गुलाम अलीम गुलाम समदानी शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शेख आरिश यांनी सदर विजअभियंता अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.
कंधार शहरातील विजपुरवठा बरेच दिवसापासून सुरळीत होत नाही. त्यामुळे जनतेला दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही वेळेत पाऊस चालू असेल किंवा नसेल तरीही विजेचा लपंडाव हा चालू आहे. म्हणून स्थानिक बऱ्याच लोकांनी विजवितरण विभागा विषयी नाराजगी व्यक्त केली असल्या कारणाने शिवसेना शाखा शहर अध्यक्ष गुलाम अलीम गुलाम समदानी भाई यांनी या गोष्टींची दखल घेऊन निवेदन दिले व वेळेत अमलबजावणी झाली नाही तर उपोषणाचा इशारा ही दिला. त्यावेळी बरेच कार्यकर्ते उपस्थित होतो.








