टीम लोकमन सोलापूर |
महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त बुधवार दिनांक १ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता पोलीस परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त मुख्यालय सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. २५ एप्रिल २०२४ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
तर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ७ .१० वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते सकाळी ६.४५ वाजता ध्वजारोहण होणार आहे.
तरी या शासकीय ध्वजारोहण समारंभास सर्व शासकीय यंत्रणा व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.










