news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ; भाजपला सर्वाधिक जागा, शिंदेंची बोळवण तर दादांची घसरण, कोण किती जागा लढणार?

टीम लोकमन by टीम लोकमन
July 30, 2024
in राजकीय
0
मुहूर्त ठरला ! राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला? महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे मिळणार? इच्छुक आमदारांची मोर्चेबांधणी सुरू

टीम लोकमन मंगळवेढा |

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ठरल्याची माहिती आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ठरलेल्या फॉर्मुल्यामध्ये चार-पाच जागा मागेपुढे होऊ शकतात, मात्र महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे.

भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढविणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला 60 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला 70 जागा देण्यात येणार आहेत. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील. मात्र काही जागा यास अपवादही ठरतील असेही वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा प्रचंड गोंधळ उडाला व त्याचा फटका महायुतीला बसला होता. यावेळी मात्र कोणताही गाजावाजा न करता गुप्तपणे महायुतीच्या शीर्षस्थ नेत्यांनी जागावाटपाची बोलणी केल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकएकटे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन विधानसभा जागावाटपाची चर्चा केली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेबाबतचा कटु अनुभव भाजपला आला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात अत्यंत सावध असलेल्या भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढविणार असल्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटाला 60, तर शिंदे गटाला 70 जागाच देणार असल्याचेही स्पष्टपणे सांगितले आहे.

भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकल्या होत्या. तसेच 10 अपक्ष आमदारही भाजपसोबत आहेत. त्यामुळे विद्यमान सर्व जागा भाजप लढणार आहेच. शिवाय याआधी जिंकलेल्या 35 पेक्षा जास्त जागाही लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे. या 35 जागा महायुतीत सध्या शिंदे गट व अजित पवार गट यापैकी कुणाकडे किती आहेत हे स्पष्ट नाही. मात्र या 35 जागांवरून वाद होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादांची 90 वरून 60 वर घसरण

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या 90 जागा देण्याचा शब्द दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे त्यांना जास्त जागा देऊन जोखीम उठविण्यासाठी भाजपचे नेतृत्व तयार नाही. अजित पवार गटाच्या वाट्याला केवळ 60 च्या आसपासच जागा येतील. यामध्ये त्यांच्यासोबत आलेले विद्यमान आमदार व काही अपक्ष आमदारही आहेत.

शिंदे गटाला 100 जागांची अपेक्षा पण 70 जागांवरच बोळवण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 जागांची मागणी केली होती. पण त्यांच्या वाट्याला केवळ 70 च्या आसपासच जागा येतील. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतल्या जिंकलेल्या जागांचे गणित भाजपच्या नेतृत्वापुढे मांडले. पण यातील बहुतांश जागा तिरंगी लढतीत आलेल्या हे आहेत असे भाजपचे म्हणणे आहे. तसेच शिंदे यांच्याकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे 70 जागांची लक्ष्मणरेखाच भाजपने त्यांच्यासाठी आखल्याचे दिसत आहे.

Previous Post

मंगळवेढा तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या मरवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गावविकास आघाडीच्या अंजली हरिदास चौधरी यांची निवड

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा लालपरीची चाके थांबणार, एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत ; 2021 मध्ये झाला होता सलग 54 दिवस संप, काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group