news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

‘खेकड्या’ ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केलीय ; पुण्यातील घटनेवरून आमदार रोहित पवार यांचा निशाणा

टीम लोकमन by टीम लोकमन
May 26, 2024
in ताज्या घडामोडी
0
‘खेकड्या’ ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केलीय ; पुण्यातील घटनेवरून आमदार रोहित पवार यांचा निशाणा

टीम लोकमन मंगळवेढा |

पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दावा केला आहे की, मी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल होत असून याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले आहे की, आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर आपल्या संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा प्रश्नांचा भडीमार रोहित पवार यांनी केला आहे.

डॉ. भगवान पवार यांनी काय आरोप केलेत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. भगवान पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावर आरोप करताना म्हटले की, मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी असून माझी एकूण 30 वर्षांची सेवा झालेली आहे. मागच्या पाच वर्षात माझी कामगिरी अत्यंत चांगली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझ्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोरोना काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. आयुक्त आरोग्य सेवा, मुंबई, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडून माझा वेळोवेळी सत्कार झाला आहे. माझे कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून मला त्रास देण्याच्या हेतूने माझे निलंबन करण्यात आले आहे. मंत्र्यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही, हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक केली आणि माझे निलंबन केले, असा आरोप डॉ. भगवान पवार यांनी केला आहे.

Previous Post

अमोल रत्नपारखी ज्वेलर्सच्या वतीने स्व. संजय सविता वाचनालयास लॅमिनेशन मशीन भेट

Next Post

राज्य दुष्काळाच्या छायेत ! महाराष्ट्रावर मोठे जलसंकट ; राज्यातील मंत्री परदेशी पर्यटनात तर काही देवदर्शनात व्यस्त, दुष्काळाच्या बैठकीलाही अनेक पालकमंत्र्यांची दांडी  

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

शुक्रवारी मंगळवेढा येथे रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटी यांचेवतीने पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन ; अनिलभाऊ इंगवले, डॉ. कैलाश करांडे, सुशील आवताडे, डॉ. नंदकुमार शिंदे यांची उपस्थिती

November 6, 2025
तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी अभ्यासिकेचा फायदा घ्यावा : कार्यकारी अभियंता चंद्रकांत ढगे ; मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

October 27, 2025
आज मंगळवेढा येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. विक्रम काळे यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ ; माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, ज्येष्ठ पत्रकार दिगंबर भगरे यांची प्रमुख उपस्थिती

October 2, 2025
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आज ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन : वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर

September 25, 2025
कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

कौतुकास्पद ! मंगळवेढा येथील सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास

September 23, 2025
आयशर टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सोलापूर जिल्ह्यातील युवा उद्योजकाचा जागीच मृत्यू

सांगोला शहरानजीक दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी ; मजुरीच्या कामासाठी जात असताना काळाचा घाला

September 22, 2025
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group