news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी ! राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ ; पवारांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा, अवतीभवती असणार सुरक्षेचे कडे आणि मोठा फौजफाटा

टीम लोकमन by टीम लोकमन
August 21, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
मोठी बातमी ! सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता, जिल्ह्यातील मोठा नेता शरद पवारांच्या गळाला ? ‘हा’ मोठा नेता आपल्या कळपात घेऊन पवार ठाकरेंना देणार धक्का?

टीम लोकमन मंगळवेढा |

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण आणि कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आता केंद्राची झेड प्लस सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या सुरक्षित मोठी वाढ करण्यात आली आहे.

सध्या राज्याची झेड प्लस सुरक्षा शरद पवारांना आहे. मात्र आता केंद्राची देखील झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्र शासनाने शरद पवारांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता पवारांच्या अवतीभवती सुरक्षेचे मोठे कडे असणार आहे. आणि सोबत मोठा फौजफाटा सुद्धा तैनात असणार आहे.

शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे. आजपासून सीआरपीएफचे दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहे. नुकताच शरद पवारांसोबत सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्यानंतर शरद पवारांना सुरक्षा प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी

शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि भेटीगाठी होत असतात. रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेतेमंडळी येत असतात. मात्र बदलापूर प्रकरणानंतर सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे.

आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरही वातावरण तापण्याची शक्यता

शरद पवार आगामी निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणार आहेत. शरद पवार काही महिन्यांपूर्वी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी गेले होते. त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी काळात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शरद पवार यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून आता त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा असणार आहे.

Z+ सुरक्षा कोणाला दिली जाते?

Z+ सुरक्षा ही देशातील आणि राज्यातील अत्यंत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच दिली जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना Z+ सुरक्षा दिली जाते. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. पहिल्या घेराव्यास एनएसजी जबाबदार आहे. दुसरा थर एसपीजी कमांडोद्वारे ठेवलेला आहे. त्यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ जवानांचाही समावेश आहे. या सुरक्षेमध्ये एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची सुविधा देखील दिली जाते.

Previous Post

मोठी बातमी ! माझी सुरक्षा व्यवस्था तात्काळ काढून घ्या, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती ; ‘हे’ मोठे कारण आले समोर

Next Post

रोहिणी चौधरी यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार ; झिरो एनर्जी शाळेचे दत्तात्रय वारे सरांच्या हस्ते पुरस्कार देऊन केले सन्मानित

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group