news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मनाचा मोठेपणा ; सोलापूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, आषाढी यात्रेतील उत्कृष्ठ कामाचा झाला गौरव

सातारा व पुणे जिल्ह्यातील सन्मानपत्र विभागीय आयुक्तांकडे

टीम लोकमन by टीम लोकमन
July 7, 2025
in ताज्या घडामोडी
0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मनाचा मोठेपणा ; सोलापूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान, आषाढी यात्रेतील उत्कृष्ठ कामाचा झाला गौरव

टीम लोकमन पंढरपूर |

आषाढी यात्रा कालावधीत सर्व संताच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात भाविकांसाठी खास सुविधा देऊन उत्कृष्ठ काम केल्याबद्दल सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेहस्ते गौरव करण्यात आला.

दरम्यान पंढरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात निर्मलदिंडीच्या समारोप समारंभात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करणेत आला. सातारा व पुणे जिल्ह्याचे सन्मानपत्र विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुंडकुलवार यांचेकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेहस्ते सुपूर्द करणेत आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे होते.

यावेळी राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुंडकुलवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजित पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देंवेद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, उपसचिव डाॅ. पदमश्री बायनाडे, सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, प्रणव परिचारक, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकंबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक अविनाश गोडसे, झेड ए शेख, अधिक्षक शहानवाज तांबोळी, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, क्षमता बांधणी समन्वयक शंकर बंडगर, सनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, सांडपाणी सल्लागार प्रशांत दबडे, अल्फीया बिराजदार, सुजाता साबळे, तेजस्विनी साबळे, आनंद मोची, रत्नदीप फडतरे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले तर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी आभार मानले

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार अन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री यांना बोलून ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासनातील अधिकारी यांनी चांगले काम केलेचे निदर्शनास आणून दिले नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा वारकरी फेटा, उपरणे घालून सन्मान केला. पालकमंत्री गोरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व सिईओ कुलदीप जंगम यांचा सन्मान करणेची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली. पालकमंत्री गोरे यांनी हे काम सफाई कर्मचारी यांचे पासून विभागीय आयुक्त यांचे पर्यंत सर्वानी परिश्रम घेतले आहेत असे सांगून श्रेय सर्वाना देऊन टाकले.

Previous Post

राज्य शासनाच्या स्वच्छ वारी निर्मल वारी उपक्रमांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निर्मल दिंडीचा आज दुपारी पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेहस्ते समारोप

Next Post

मंगळवेढा येथील नूतन मराठी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश, 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत ; शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group