news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज ! आषाढी वारीतील वारकऱ्यांना पिण्यासाठी 299 टँकरने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे

टीम लोकमन by टीम लोकमन
July 2, 2024
in ताज्या घडामोडी
0
वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज ! आषाढी वारीतील वारकऱ्यांना पिण्यासाठी 299 टँकरने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे

टीम लोकमन सोलापूर |

आषाढी वारी २०२४ अंतर्गत सोलापूर जिल्हयात मानाच्या १० पालख्यांच्या मार्गावरील ७७ गावामध्ये वारकऱ्यांसाठी १९२ शासकीय व ९७ खाजगी व इतर १० असे एकूण २९९ टँकरने पिण्यासाठी पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगीतले की, आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हयात श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दि. १० जुलै २०२४ रोजी तर श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी दि. ११ जुलै २०२४ रोजी प्रवेश करीत आहे. जिल्हयात ९ तालुक्यात श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. तुकाराम महाराज, श्री. संत मुक्ताबाई, श्री. संत सोपानकाका महाराज, श्री. संत निवृत्तीनाथ महाराज, श्री. संत एकनाथ महाराज, श्री. संत गजानन महाराज, श्री. संत निळोबाराय महाराज, श्री क्षेत्र कौडण्यपूर, श्री. संत योगीराज चांगावटेश्वर महाराज या दहा मानाच्या पालख्या प्रवेश करतात. त्यामुळे सदर मानाच्या १० पालख्यांच्या मार्गावरील ७७ गावामध्ये वारक-यांसाठी १९२ शासकीय व ९७ खाजगी व इतर १० असे एकूण २९९ टँकरने पिण्यासाठी पुरेसा व शुध्द पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी बोअर व विहीर अशा एकूण ७९१ स्त्रोत निश्चित करून या स्त्रोतांचे जलशुध्दीकरण करण्यात आले आहे. तसेच पाणी शुध्दीकरणासाठी प्रती २५ किलोचे १ हजार ५३० इतकी पोती टी.सी.एल. पावडरचा पुरवठा पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना करण्यात आला आहे.

सुनिल कटकधोड कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पिण्यासाठी शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, उपविभाग, आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायतीमधील अधिकारी व कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सदर अधिकारी व कर्मचारी यांना पाणी पुरवठा नियमन करणे, टी.सी.एल. पावडरचा पुरवठा करणे, पाणी स्त्रोतांच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे, टँकर भरण्याच्या जागा निश्चित करणे, पालखी मार्गावरील सर्व उदभवांचे सर्वेक्षण करणे, पाणी नमुने तपासणी करणे, पाणी शुध्दीकरण करून पुरवठा करणे या कामांची जबाबदारी देण्यात आली आहे.

अमोल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)

पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या सर्व उदभवांचे सर्वेक्षण करणे, पाणी नमुने तपासणी करणे आणि वारकऱ्यांना पाणी शुध्दीकरण करून पुरवठा करणे. आदी कामे अतिशय जबाबदारीने करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे दक्षता घेत आहेत.

डॉ. संतोष नवले  जिल्हा आरोग्य अधिकारी

Previous Post

कौतुकास्पद ! जत तालुक्यातील शेगावच्या ओम साई प्रतिष्ठानने स्वीकारले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 19 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

Next Post

एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात उमदी पोलिस ठाण्याच्या वतीने पोलीस पाटील व पत्रकारांसाठी चर्चासत्र संपन्न

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group