टीम लोकमन मरवडे |
आज ग्रामपंचायत मरवडे येथे भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मरवडे ग्रामपंचायत कार्यालयात मरवडे गावच्या सरपंच अंजना चौधरी यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर समाजप्रबोधनपर घोषणा दिल्या. मरवडे ग्रामपंचायत कडून गावातील विकासाला हातभार लावणाऱ्या व नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांचा फेटा बांधून व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर देशसेवेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा तसेच मातृभूमीचे सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तसेच गावातील संपूर्ण गाव दररोज स्वच्छता करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच नितीन उर्फ सचिन घुले यांनी केले. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सामाजिक कार्याची भावना निर्माण करण्यासाठी गावातील करदाते, माजी सैनिक यांचा सत्कार करण्याची संकल्पना कार्यतत्पर ग्रामसेविका राखी जाधव यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या माध्यमातून यशस्वी करून दाखवली.
कार्यक्रमाचा समारोपानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच नितीन उर्फ सचिन घुले यांनी केले. उपसरपंच कु.दीक्षा शिवशरण यांनी आभार मानले.
यावेळी मरवडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सुमन गणपाटील, ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षी सूर्यवंशी, मीरा जाधव, रेश्मा शिवशरण, पूनम मासाळ, दिपाली ऐवळे, संजयकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष सचिन घुले, गावविकास आघाडीचे नेते संदीप सूर्यवंशी, पैलवान दामोदर घुले, निवृत्ती सूर्यवंशी, निवृत्ती जाधव सर, राजकुमार मेहेर सर, अरुण गायकवाड, राजाराम मस्के, कुंडलिक गणपाटील, मधुकर घुले, लवटे गुरुजी तसेच मरवडे गावातील ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, मरवडेच्या मंडल अधिकारी प्रतिभा घुगे, हनुमान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य हनुमंत वगरे, पोलीस पाटील महेश पवार, ग्रामपंचायत कर्मचारी नंदकुमार जाधव, पांडुरंग मोरे, उमेश लवटे, नवनाथ बनसोडे, संजय गायकवाड उपस्थित होते.








