मंगळवेढा : अभिजीत बने
माध्यमिक शिक्षकांचे विशेषतः विनाअनुदानित माध्यमिक शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अखंडित कार्यरत राहून अविरत प्रयत्न करणारे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता ते एका वेगळ्या उपक्रमामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. दत्तात्रय सावंत यांच्यामुळे आता मंगळवेढा तालुक्यातील 1421 शिक्षकांच्या घरात आंबे पिकणार आहेत.
माजी आमदार दत्तात्रय सावंत हे माध्यमिक शिक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांच्या कार्यपद्धतीने त्यांनी माध्यमिक शिक्षकांच्या मनामनात आपले स्थान निर्माण केले आहे. माध्यमिक शिक्षकांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सावंत यांनी आपले अवघे जीवन समर्पित केले आहे. माध्यमिक शिक्षकांना सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान अधिकच समृद्ध करण्यासाठी दत्तात्रय सावंत गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत प्रयत्न करीत आहेत.
विनाअनुदानित शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावून त्यांना समाजामध्ये ताठ मानेने जगता यावे. त्यांचे जीवन सुखकर आणि समृद्ध व्हावे यासाठी सावंत यांनी रात्रीचा दिवस करून लढा दिला. परंतु गेल्या निवडणुकीत बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही पराभवाने खचून न जाता शिक्षकांसाठीचे कार्य त्यांनी अखंडितपणे सुरूच ठेवले आहे.
2024 चा उन्हाळा सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालून गेला. यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये तापमान 50°c च्या पुढे गेल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता पर्यावरणाबाबत जागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी दत्तात्रय सावंत यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या संकल्पनेतून ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा उपक्रम राबविला जात असून त्या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र माळी सर यांच्या शिस्तबद्ध आणि योग्य नियोजनातून मंगळवेढा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा 1421 जणांना केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले आहे. सावंत यांच्या या उपक्रमाचे शिक्षक वर्गातून स्वागत होत आहे. सावंत यांनी दिलेल्या या केशर आंब्याच्या रोपांमुळे पर्यावरणाचा समतोल तर राखला जाणार आहेच शिवाय तालुक्यातील शिक्षकांना गोड फळे देखील चाखता येणार आहेत.
या शाळांमधील शिक्षकांना दिले आंब्याचे रोप…
शरदचंद्रजी पवार विद्यालय शरदनगर, शरदचंद्र कृषी विद्यालय मारापुर, स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव, लक्ष्मीदेवी विद्यामंदिर लक्ष्मीदहिवडी, कै. दत्ताजीराव भाकरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आंधळगाव, श्री सिद्धनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे, वेताळ विद्यामंदिर शिरशी, स्वामी विवेकानंद विद्यालय गोणेवाडी, श्री कामसिद्ध विद्यालय खुपसंगी, शारदा- सिद्धनाथ विद्यालय पाटखळ, गणेश विद्यालय गणेशवाडी, माध्यमिक विद्यालय जुनोनी या शाळांना भारत रायबान सर, माणिक गुंगे सर व रवी मोरे सर यांनी प्रत्येक शाळेवर जाऊन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केशर आंब्याचे रोप दिले.
संगम विद्यालय डोंगरगाव, कै. लक्ष्मण दादा आकळे विद्यालय हाजापूर, विद्यानिकेतन जालीहाळ, लक्ष्मीदेवी विद्यामंदिर रड्डे, बाळकृष्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज नंदेश्वर, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा हुन्नूर, प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा पडोळकरवाडी, इंग्लिश स्कूल भोसे, भैरवनाथ विद्यालय शिरनांदगी, गुरुकुल विद्यालय शिरनांदगी या शाळांना लक्ष्मण गळवे सर, उमाप सर यांनी केशर आंब्याचे रोप वाटप केले.
छत्रपती शिवाजी विद्यालय खोमनाळ, बाळकृष्ण विद्यालय भाळवणी, न्यू इंग्लिश स्कूल निंबोणी, सद्गुरु बागडे बाबा विद्यालय बावची, विद्यामंदिर हायस्कूल सलगर बुद्रुक, कै.श्रीपतराव माने विद्यालय लवंगी, सर्वोदय विद्यालय शिवनगी, मानसिंगका विद्यालय सोडडी, महालिंगराया विद्यालय हुलजंती, प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज आश्रमशाळा येड्राव या शाळांना बंडगर सर व कांबळे सर यांनी केशर आंब्याचे रोप वाटप केले.
कै. धर्मराज जाधव विद्यालय धर्मगाव, विलासराव देशमुख विद्यालय साखर कारखाना, श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर, माध्यमिक प्रशाला अरळी, नूतन प्रशाला बोराळे, मातृलिंग विद्यालय सिद्धापूर, शरण बसवेश्वर विद्यालय नंदुर, महासिद्ध विद्यालय डोणज, प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनिअर कॉलेज बालाजीनगर, हनुमान विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मरवडे, रेवणसिद्ध विद्यालय तळसंगी या शाळांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे तालुकाध्यक्ष विकास मोरे सर व कांबळे सर यांनी केशर आंब्याचे रोप वाटप केले.
तसेच श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, महाराणी ताराबाई विद्यालय मंगळवेढा, उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा, जवाहरलाल हायस्कूल मंगळवेढा, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम व मराठी मिडीयम स्कूल मंगळवेढा, श्री संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा, कै. लक्ष्मीबाई दत्तू प्रशाला मंगळवेढा, धवल इंग्लिश मीडियम स्कूल मंगळवेढा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेढा या शाळांना सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र माळी व दांडगे सर यांनी केशर आंब्याचे रोप वाटप केले.
मंगळवेढा तालुक्यात सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी, वसतीगृह कर्मचारी या सर्वांना 1421 केशर आंब्याचे रोप वाटप करून वृक्षारोपण करण्याविषयी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सोबत दिलेल्या स्नेह पत्रानुसार आवाहन केले. या उपक्रमाबद्दल मंगळवेढा तालुक्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.