news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण उपक्षेत्रीय कार्यालय नांदेड यांचेवतीने स्वच्छता पखवाडा विविध कार्यक्रमांनी साजरा

टीम लोकमन by टीम लोकमन
June 29, 2024
in आरोग्य
0
राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण उपक्षेत्रीय कार्यालय नांदेड यांचेवतीने स्वच्छता पखवाडा विविध कार्यक्रमांनी साजरा

नांदेड : उज्वला गुरसुडकर

सार्वत्रिक स्वच्छता कव्हरेज मिळविण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन सुरू केले. ज्याला सरकार द्वारा देशव्यापी मोहीम/जनआंदोलनाच्या रूपात राबवले जात आहे. यालाच पुढे नेत भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय द्वारा दिनांक 16 जून ते 30 जून या कालावधीत स्वच्छता पखवाडा साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (क्षे.सं.प्र.), उप क्षेत्रीय कार्यालय,नांदेड यांच्या तर्फे दिनांक 19.06.2024 ते 20.06.2024 दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय (क्षे.सं.प्र.), क्षेत्रीय कार्यालय, नांदेड द्वारे दिनांक 19/06/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, शहाजीनगर नांदेड मधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी शाळेत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात श्री शांतणु प्रमाणिक, प्रभारी वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी, राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण उप क्षेत्रीय कार्यालय,(क्षे.सं.प्र), नांदेड द्वारा कार्यक्रमाचे उद्दिष्ट व कार्यक्रमाचे स्वरूप विशद करून विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्यासाठी मार्गदर्शन केले. याशिवाय या कार्यक्रमादरम्यान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले व शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी “स्वच्छतेची शपथ” घेतली.

सामान्य जनतेला स्वच्छतेचे फायदे समजावेत व त्यांनी त्यांच्या सभोवताली नेहमी स्वच्छता राखावी यासाठी उपक्षेत्रीय कार्यालय, नांदेड यांच्या वतीने कार्यालयाचे प्रमुख श्री.शांतणु प्रमाणिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक व विद्यालय, शहाजी नगर परिसरात पथ रैली काढून परिसरात जनजागृती केली.

दि 20/6/2024 रोजी काळेश्वर संस्थाणचे सचिव शंकरराव हंबर्डे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व‌ कार्यालयाचे प्रमुख वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी शांतनु प्रमाणिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काळेश्वर मंदीर संस्थान विष्णुपुरीच्या परिसरामध्ये पथनाट्यचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच संस्थान परिसरातील प्रसाद विक्रेते तसेच भविकानां स्वच्छतेबाबत सतर्क राहण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी पिशवी अथवा कागदी लिफाफ्यांमध्ये खरेदी/विक्री करण्यासाठी जागरूकता कार्यक्रम करण्यात आला. यासोबतच संस्थान परिसरात स्वच्छतेसाठी श्रमदान ही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी कार्यालय प्रमुख, वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी शातणु प्रमाणिक राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण उपक्षेत्रीय कार्यालय (क्षे.सं.प्र), नांदेडद्वारा शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक तसेच काळेश्वर संस्थाणचे सचिव शंकरराव हंबर्डे साहेब यांचे उपस्थित सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या दरम्यान कार्यालयाकडून वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी अभिजीत हालदर, राम नरेश, धिरज कुमार, व कार्यालयचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

उमदी पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांचा डॉ. सार्थक हिट्टी यांचेवतीने सत्कार

Next Post

रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचे 2024-25 चे प्रेसिडेंट डॉ. अमित गायकवाड-पाटील, रविवारी पदग्रहण समारंभ ; डॉ. संजीव ठाकूर, सुधीर लातुरे, बबनराव शेंडगे यांची उपस्थिती

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group