news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

सूर्योदय अर्बन, एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय महिला अर्बनची आज सांगोला येथे वार्षिक सर्वसाधारण सभा, गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरणही होणार : अनिलभाऊ इंगवले

टीम लोकमन by टीम लोकमन
September 7, 2025
in सामाजिक
0
सूर्योदय अर्बन, एलकेपी मल्टीस्टेट, सूर्योदय महिला अर्बनची आज सांगोला येथे वार्षिक सर्वसाधारण सभा, गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरणही होणार : अनिलभाऊ इंगवले

टीम लोकमन सांगोला |

सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि एलकेपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या तिन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आल्याची माहिती या तिन्ही संस्थांचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

सांगोला शहरातील मिरज रोडवर असलेल्या सदानंद मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सूर्योदय महिला अर्बनच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात येणार असल्याची माहिती सूर्योदय परिवाराचे प्रमुख अनिलभाऊ इंगवले दिली.

या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सहभागाबद्दल आकर्षक भेटवस्तू देखील यावेळी देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, पशुपालक तसेच छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक, शासकीय नोकरदार त्याचबरोबर होतकरू तरुणांसह समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक गरजांसाठी प्राधान्याने धावून जाणारी आर्थिक संस्था असायला हवी. हा लोकहितवादी विचार करून दूरदृष्टीने जनमानसाची नेमकी नाळ ओळखणारे अनिलभाऊ इंगवले यांनी आपले सहकारी मित्र जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ. बंडोपंत लवटे आणि सुभाष दिघे गुरुजी यांच्या शुभ सोबतीने या सर्व संस्थांची उभारणी अत्यंत तळमळीने केली आहे.

सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधांसह सेवाभावी वृत्तीचा कर्मचारी वृंद आणि विविध प्रकारचे उपक्रम त्याचबरोबर ठेवीवरील आकर्षक व्याजदर यामुळे या संस्था नावारुपास आल्या असून ठेवीदाराच्या ठेवींचे संरक्षण आणि शंभर टक्के कर्जवसुली ही या संस्थांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र असलेल्या एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची ही बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा असून सूर्योदय अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची आठवी तर सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे.

या कार्यक्रमासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले सर्व स्पर्धक तसेच तीनही संस्थांचे सर्व सभासद बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय अर्बनचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे, सूर्योदय अर्बन महिला चेअरमन सौ. अर्चना अनिल इंगवले, व्हाईस चेअरमन सुभाष दिघे गुरुजी व सौ. ज्योती जगनाथ भगत उपस्थित होते.

Previous Post

आझाद मैदान मुंबई येथील सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगावच्या हेंबाडे वस्ती येथील मराठा युवकांनी पाठवली मदत 

Next Post

पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी विभागाची पालकसभा उत्साहात संपन्न

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group