माडग्याळ : नेताजी खरात
शब्दपंढरी भाषण अकॅडमी सांगली व समस्त लिंगायत समाज सांगली यांचेवतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त १८ मे रोजी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे विश्वशांती मंडळ सांगली येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ातून तब्बल १३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
जत तालुक्यातील गुड्डापुर येथील श्री दानेश्वरी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनीही या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये मध्यम गटात श्रावणी विनायक सुर्वे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर पृथ्वी प्रशांतकुमार शिवनगी याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर लहान गटामध्ये कुमारी वेदिका नेताजी खरात हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व रोख रक्कम असे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे विद्यालय व संस्थेच्या वतीने तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.









