टीम लोकमन मंगळवेढा |
गतवर्षी प्रमाणे देण्यात येणारा सोलापूर जिल्हा माध्यमिक सेवक शिक्षक पतसंस्था मर्या.बाळे, सोलापूर आदर्श शिक्षक पुरस्कार उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी बद्दल विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून शरद पवार विद्यालयातील सहशिक्षक भारत मच्छिंद्र रायबान यांना देण्यात आला.
याप्रसंगी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र माळी, सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार विद्यालयाचे अध्यक्ष प्रथमेश पाटील, सचिव बळवंत पाटील, प्राचार्य पंढरीनाथ माने, पाटील ए. टी., सर, पवार सर, कोरे सर, गोडसे सर, गायकवाड सर, प्रा. भुसे एल. एन., शिक्षकेतर कर्मचारी पाटील धनाजी, बापुसो तोरमळे, अभिषेक गोडसे उपस्थित होते. सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.









