टीम लोकमन सोलापूर |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता ४३ माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडुन जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून श्रीमती रूपाली ठाकूर (भा.प्र.से ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ४२ सोलापूर लोकसभा (अ.जा.) मतदारसंघासाठी मिथिलेश मिश्र (भा.प्र.से.) यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जनरल निवडणूक निरीक्षक श्रीमती रूपाली ठाकूर (भा.प्र.से ) यांचे कार्यालय चित्रा शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून, निवडणूकीच्या अनुषंगाने कोणालाही भेटायचे अथवा कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास सामान्य निवडणूक निरीक्षक हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर नसताना सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत चित्रा, शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे भेटीसाठी उपलब्ध होतील. तसेच त्यांचा संपर्क क्रमांक ८४६८९६३४१८ हा असून सदर क्रमांकावर भ्रमणध्वनी अथवा व्हॉटसअपवर संदेशाव्दारे संपर्क साधता येईल.
जनरल निवडणूक निरिक्षक मिथिलेश मिश्र (भा.प्र.से.) यांचे कार्यालय रेवती, शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून निवडणूकीच्या अनुषंगाने कोणालाही भेटायचे किंवा कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास सकाळी १० ते ११ या वेळेत रेवती, शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा. तसेच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९५१८५५४०४३ हा असून त्यांचेशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधता येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी कळविले आहे.








