news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

पंढरपूर येथील एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात Solidworks सॉफ्टवेअर प्रशिक्षण संपन्न

टीम लोकमन by टीम लोकमन
January 29, 2025
in शैक्षणिक
0
पंढरपूर येथील एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात Solidworks सॉफ्टवेअर प्रशिक्षण संपन्न

टीम लोकमन पंढरपूर |

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूरच्या मेकॅनिकल विभागात SolidWorks सॉफ्टवेअरवरील विशेष मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जे.करांडे, उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी, इतर प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मयुर बेलेकर व प्रथमेश दळवी या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

छत्रपती संभाजीनगर येथील इंडो-जर्मन टूल रूमच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रगत औद्योगिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे. विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत SolidWorks सॉफ्टवेअरचे उद्योग क्षेत्रातील महत्त्व उलगडून दाखवले. त्यांनी या सॉफ्टवेअरमुळे उत्पादकता कशी वाढते आणि व्यावसायिक डिझाइन प्रक्रियांना गती कशी मिळते याबाबत माहिती सांगीतली.

कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रसाद कुलकर्णी यांनी SolidWorks सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती देताना सांगितले की, या सॉफ्टवेअरमुळे प्रॉडक्ट डिझाइन, सिम्युलेशन आणि इतर प्रगत डिझाइन प्रक्रिया विद्यार्थ्यांना शिकता येतील, ज्यामुळे त्यांचे औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य व कार्यक्षमता वाढेल.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करत असे कार्यक्रम केवळ तांत्रिक ज्ञान विकसित करण्यापुरते मर्यादित नसून, ते विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक यशासाठी मार्गदर्शक ठरतात, असे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा पूर्ण लाभ घेण्याचे आवाहन केले.

या कोर्समध्ये SolidWorks सॉफ्टवेअरच्या विविध उपयोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. यात 3D डिझाइन, सिम्युलेशन, फायनाईट एलिमेंट ऍनालिसिस (FEA) आणि इतर प्रगत संकल्पनांचा समावेश असेल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन आणि डिझाइनच्या व्यावसायिक गरजांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे काम करता येईल. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा संपूर्ण लाभ घेऊन आपले तांत्रिक कौशल्य प्रगल्भ करण्याचा निर्धार केला आहे. SolidWorks सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण औद्योगिक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी त्यांना निश्चितच स्पर्धात्मक स्थान निर्माण करून देईल.

महाविद्यालयाने असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे, ज्यामुळे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत राहतील आणि जागतिक औद्योगिक गरजांशी जोडले जातील. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

GBS चा धोका ! मुंबईसह पुणे, नागपूर, सोलापूर व कोल्हापूरमध्ये आढळले रुग्ण ; सोलापुरात रुग्णाचा झाला मृत्यू, यासंदर्भात काय म्हणाले राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर?

Next Post

लाभार्थी हतबल ! गोरगरीब महिला श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानापासून वंचित ; आक्रमक शिवसैनिकांचा तहसील कार्यालयात ठिय्या, प्रा. येताळा भगत व माऊली कोंडुभैरी यांचा आंदोलनाचा इशारा

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group