news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

साहेब तुम्हीपण? लाच घेताना चक्क न्यायाधीशालाच रंगेहात पकडले, साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सर्वात मोठी कारवाई ; अनपेक्षित घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ

टीम लोकमन by टीम लोकमन
December 11, 2024
in ब्रेकिंग न्यूज
0
साहेब तुम्हीपण? लाच घेताना चक्क न्यायाधीशालाच रंगेहात पकडले, साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सर्वात मोठी कारवाई ; अनपेक्षित घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ

टीम लोकमन मंगळवेढा |

आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचारा विरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय होय. लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्याविरुद्धची लढाई सुद्धा मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते.

मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडलीय. या घटनेमुळे सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कासाठीचे शेवटचे आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेने तडा गेला आहे.

पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तपणे साताऱ्यात हि मोठी कारवाई केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह तीघांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या सर्व घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शन विभागाच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो आता त्याच न्यायव्यवस्थेवर या कारवाईने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे. पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेलच. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल. अशीच सर्वसाधारण भावना असते. मात्र चक्क न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळल्याने नेमका विश्वास ठेवायचा कुणावर असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पोलीस व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण थेट न्यायपालिकेतील वरिष्ठच अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Previous Post

खळबळजनक ! पोलीस असलेल्या वर्गमित्रानेच केला 36 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून ; शौचालयाच्या टाकीत लपवला मृतदेह, बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेल्या आरोपीला अटक

Next Post

मोठी बातमी ! लग्नकार्यासाठी जाताना काळाचा घाला, प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपची दुचाकीला धडक, आईसह दोन चिमुकल्यांचा अपघातात जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group