माडग्याळ : नेताजी खरात
जत तालुक्यातील सिद्धार्थ पब्लिक स्कूलचा 2023-2024 चा सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल 95 टक्के लागल्याने आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सीबीएसई बोर्डाच्या दहावीतील परीक्षेत सिद्धार्थ पब्लिक स्कूलने सलग पाचव्या वर्षी 95% चांगला निकाल लावून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणातील गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.
शाळेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थी असे, प्रथम क्रमांक आयुष धनाजी टोणे 95.8%, द्वितीय क्रमांक वैष्णवी विष्णुपंत साळे 95.6%, तृतीय क्रमांक आर्या नारायण खोत 94.8% व समृद्धी अर्जुन सौदे 94.8%, चतुर्थ क्रमांक प्रबोध रवींद्र कांबळे 91% या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांना जत तालुक्यातील झाडांची कमतरता व दुष्काळ लक्षात घेऊन हार व श्रीफळ न देता झाडांची रोपे देऊन सत्कार करत विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम व आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी आणि श्री उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन जत या संस्थेच्या अध्यक्षा सौ. डॉ. वैशाली कैलास सनमडीकर, संस्थेचे सचिव डॉ. कैलास उमाजीराव सनमडीकर, शाळेचे प्राचार्य के. श्यामसुंदर कोळी, शिक्षक आणि कर्मचारी यांचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अभिनंदन केले. तसेच दर्जेदार शिक्षणाची परंपरा अखंडित चालू ठेवत यशाचा आलेख उंचवावा आणि तालुक्याचा लौकिक वाढवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.