news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन by टीम लोकमन
May 25, 2025
in क्राईम
0
मोठी बातमी ! डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने वार करत तलाठ्याची हत्या ; व्हाटसॲप चॅटवरून झाला राडा, घटनेने महसूल प्रशासनात खळबळ, महाराष्ट्र हादरला

टीम लोकमन मंगळवेढा |

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका आईसह दोन निष्पाप बालकांना पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अमानुष तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव गावचे हद्दीत एक महिला व तिचे दोन लहान मुलांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचा खून करून त्यांना पेटवून दिले आहे. सदर महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असून लहान मुलाचे वय अंदाजे 4 वर्षे व लहान बाळाचे वय अंदाजे दीड वर्षे आहे. पुणे – अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव खंडाळे परिसरात ही घटना घडली आहे.

ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तीन जळालेले मृतदेह आढळले. सकाळी कामावर येणाऱ्या कंपनीच्या कामगारांना मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. रांजणगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी ते रुग्णालयात पाठवले आहेत.

प्राथमिक तपासानुसार, मृतांमध्ये एक महिला आणि दोन लहान मुले (एक मुलगा व एक मुलगी) यांचा समावेश आहे. या तिघांना अन्यत्रून येथे आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पावसामुळे आग पूर्णपणे न लागल्याने मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडले आहेत.

या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील हरवलेल्या व्यक्तींबाबतची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच घटनास्थळी मिळालेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपशील तपासण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेऊन पोलिस या खूनामागील नेमकी कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना अत्यंत अमानुष आणि संतापजनक आहे. या घटनेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Previous Post

मोठी बातमी ! पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ ढगफुटी? पावसाचे पाणी महामार्गावर आल्याने इनोव्हा कार वाहून गेली ; जनजीवन विस्कळीत

Next Post

मोठी बातमी ! माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीचा भीषण अपघात, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना देशमुख यांची मालवली प्राणजोत ; मंत्री पंकजा मुंडेंचे सर्व कार्यक्रम रद्द

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group