news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धक्कादायक ! राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण ; पुणे विमानतळावरून बेपत्ता, पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल, तानाजी सावंत म्हणाले कमीत कमी 15 ते 20 फोन….

टीम लोकमन by टीम लोकमन
February 10, 2025
in क्राईम
0
धक्कादायक ! राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण ; पुणे विमानतळावरून बेपत्ता, पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल, तानाजी सावंत म्हणाले कमीत कमी 15 ते 20 फोन….

टीम लोकमन मंगळवेढा |

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमातळावरुन बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाची तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संध्याकाळी पाचच्या सुमारास तानाजी सावंत यांचे पुत्र ऋषिराज सावंत हे एका स्विफ्ट गाडीत बसून विमानतळावर गेले होते. त्यानंतर अचानक ऋषिराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर तानाजी सावंत यांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांचे कार्यालय गाठले. यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुणे विमानतळावरून ते बेपत्ता झाले आहेत. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी ४.५७ वाजता स्विफ्ट गाडीतून ते पुणे विमातळावर गेले होते. त्यानंतर पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमलाही यासंदर्भात निनावी फोन आला. यानंतर राज्याचे माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

“दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेलेले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली. त्यांची माहिती घेणे सुरू झाले असून ते पुण्यावरून विमानाने गेले आहेत. त्यांचे विमान कोणत्या दिशेने आणि कुठे चालले आहे याची माहिती गोळा केली जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. याबद्दल सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचकडे या संदर्भातील तपास सोपवण्यात आला आहे. त्यांना परत सुखरूप आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.

“मुलगा बेपत्ता किंवा त्याचे अपहरण झाले आहे असे काहीही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रच आहेत. माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही. अगदी जवळपास जाणार असेल तरी मुलगा मी इथे जात आहे असे सांगतो. पण यावेळी ते तिघेजण दुसऱ्याच गाडीतून गेल्याने मी अस्वस्थ झालो आहे. याबाबत त्याने कोणालाही माहिती सांगितलेली नाही. दिवसातून कमीत कमी १५ ते २० फोन एकमेकांना होतात आणि त्यात फोन आलेला नाही. हा अचानक एअरपोर्टवर कशाला गेला त्यामुळे मी अस्वस्थ झालो. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली. आता माहिती मिळत आहेत की ते विमानाने बाहेर गेले आहेत पण ते कुठे उतरणार आहेत याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. मुलाला जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो माघारी आला आणि त्याने माहिती दिली की मी त्या तिघांना एअरपोर्टला सोडून आलो. ते नेमके कुठे गेलेत हे काहीच माहिती नाही,” असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.

Previous Post

दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे… वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे… जत येथील डॉ. वाघ यांच्या श्री. दत्त क्लिनिकमध्ये मंगळवारी बालकांसाठी सुवर्णबिंदू प्राशन संस्कार : डॉ. सचिन वाघ

Next Post

स्वराज्याच्या संकल्पनेतूनच भारतीय राज्यघटना साकार : प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढ्यात शिवमुर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात

Next Post
मंगळवेढा येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने 11 ते 19 फेब्रुवारी पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन ; रक्तदान शिबीरासह वेशभूषा व चित्रकला स्पर्धा

स्वराज्याच्या संकल्पनेतूनच भारतीय राज्यघटना साकार : प्रा. शिवाजीराव काळुंगे, मंगळवेढ्यात शिवमुर्तीची प्रतिष्ठापना उत्साहात

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group