टीम लोकमन मंगळवेढा |
भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील माहेर असलेल्या 24 वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईतील मानपाडा परिसरात तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
माहेरहून दहा लाख रुपये आणावेत यासाठी सासू आणि पतीकडून तिचा छळ केला जात असल्याने नवविवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे.
जागृती सागर बारी असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसात पती सागर बारी नागपुरे आणि सासू शोभा बारी नागपुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पत्नीच्या निधनानंतर पतीने अग्नीडाग देण्यासही नकार दिल्याने अखेर नवविवाहितेवर कुऱ्हा पानाचे येथे माहेरी भावाने अग्नीडाग देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
आपल्या बहिणीला पतीने आणि सासूने गळफास देऊन मारल्याचा आरोप जागृतीच्या भावाने केला आहे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही जागृतीच्या भावाने केली आहे. कुऱ्हे पानाचे येथील शेतकरी गजानन भिका वराडे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळा येथील सागर रामलाल बारी यांचेसोबत दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे 20 एप्रिल 2024 रोजी लावून दिला होता.
सागर हा मुंबई पोलीस कर्मचारी आहे. सागरचे मित्र लग्नाला येणार असल्यामुळे एसी हॉलही बुक केला होता. लग्नात वराडे कुटुंबाने 7 लाखांपेक्षा जास्त खर्च केला होता. त्यानंतर मुलगी 21 जूनला मुंबईत पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेले होते. जागृतीचे आई-वडील भेटायला आले तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही अशी तक्रार केली. तसेच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या. अशी मागणी केल्याचा आरोपही वराडे कुटुंबाने केला आहे.









