टीम लोकमन मंगळवेढा |
सोलापूर जिल्ह्यात मुलानेच बापाची हत्या केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथे ही घटना घडली आहे. सख्ख्या मुलानेच आपल्या वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
चंद्रकांत व्हनमाने असे हत्या झालेल्या मृत वडिलांचे नाव आहे. तर सागर व्हनमाने असे आरोपीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आरोपीला मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील एका शेतकऱ्याची त्याच्या मुलानेच गळा दाबून हत्या केली. पोलिस तपासात मुलानेच वडिलाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित मुलाला मंद्रूप पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली आहे. चंद्रकांत विठ्ठल व्हनमाने असे हत्या झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आरोपीने वडिलांची हत्या का केली याबाबतचा कसून तपास पोलिस करत आहेत.
सागर चंद्रकांत व्हनमाने असे वडिलांची हत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता बोळकवठे येथील कुंभारीमध्ये राहणाऱ्या गेनप्पा महादेव पुजारी यांच्या शेतात चंद्रकांत व्हनमाने हे बेशुद्ध पडले होते. मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणची त्वचा निघाली होती. शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत व्हनमाने यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला. मात्र त्यांची हत्या कोणी केला हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे मंद्रूप पोलिसांनी चंद्रकांत व्हनमाने यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पण तपास करताना चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलाने केली असल्याचे निष्पन्न आले. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत यांच्या मुलाला अटक केली आहे.








