news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची उद्या महूद येथे जाहीर सभा

टीम लोकमन by टीम लोकमन
April 28, 2024
in राजकीय
0
धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांची उद्या महूद येथे जाहीर सभा

टीम लोकमन सांगोला |

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे यांची सोमवार दिनांक 29 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महुद बुद्रुक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या असून त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे, संवाद कौशल्यामुळे आणि वक्तृत्वामुळे त्या प्रत्येक सभा गाजवत असतात. प्रत्येक सभांमधून त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तुटून पडतात. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका करतात. कोणतीही पर्वा न करता त्या बेधडकपणे बोलतात. यामुळे त्यांच्या सभांना मोठी गर्दी होते आणि त्या नेहमी चर्चेत राहतात. विरोधी पक्षातील मातब्बर नेते सुद्धा त्यांच्या सभांकडे डोळे लावून असतात. त्या कधी कुणावर काय टीका करतील याचा नेम नसतो. त्यामुळेच सुषमा अंधारे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. सांगोला तालुक्यात आल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजी बापूंवर त्या नक्कीच तोंडसुख घेणार यात शंका नाही. यामुळे महूदच्या सभेत त्या नेमक्या काय बोलतात याची उत्सुकता संपूर्ण सांगोला तालुक्याला आहे.

महूद बुद्रुक ता. सांगोला येथे होणाऱ्या या सभेसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाच्या सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व महूद परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Previous Post

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील उद्या सांगोला दौऱ्यावर ; मराठा समाजाच्या बैठकीला संबोधित करणार

Next Post

सोलापूरच्या मार्कंडेय सहकारी रुग्णालयात रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध व्हावेत ; डॉ. शैलेश पुणतांबेकर

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

February 18, 2026
मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश मिडियम प्रशालेत ‘Zenith 2K26’ वार्षिक स्नेहसंमेलनाची धमाल ; चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराला नूतन नगराध्यक्षांची दाद

February 5, 2026
कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

कौतुकास्पद ! आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर समितीने सांगोल्याच्या झोपडपट्टीतील गरीब मुलांना घडवली सांगोला यात्रेची सफर

February 1, 2026
मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

मोठी बातमी ! राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, उद्या होणार सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा?

January 30, 2026
डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

डिकसळ येथील कृष्णाबाई बाबू फुगारे यांचे निधन

January 27, 2026
मोठी बातमी ! सामुदायिक विवाह सोहळा आटोपून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; कोल्हापूर येथील तरुण उद्योजक दांपत्याचा करुण अंत तर अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्या लेकीला मात्र मिळाले जीवदान

January 25, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group