टीम लोकमन मंगळवेढा |
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी मेळावा व वैद्यकीय सन्मान सोहळा दिनांक 30 मे रोजी दुपारी 2 वाजता लोटस हाॅल रेल्वे सिमेंट गुडस शेजारी मार्केट यार्ड कोल्हापुर या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी दिली.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी मेळावा व वैद्यकीय सन्मान सोहळा प. पु. काडसिध्देश्वर स्वामीजी मठाधिपती श्री. सिध्दगिरी संस्थान मठ, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च्य शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र नियोजन मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर, हभप राणा महाराज वासकर अध्यक्ष वारकरी पाईक संघ पंढरपुर, खासदार धनंजय महाडीक,माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार शिवाजी पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडीक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, आमदार सुहास बाबर, आमदार महेश शिंदे, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार सुजीत मिणचेकर, माजी आमदार शहाजीबापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दुपारी पहिल्या सत्रात दुपारी 3 वाजता डाॅ.शार्दुल भणगे यांचे अवयवदान चळवळ जनजागृती, दुपारी 3.30 वाजता जगदीश ओहोळ यांचे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा, सायंकाळी 4 वाजता जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे 65 वर्षाचा महाराष्ट्र व पुढील आव्हाने तर द्वितीय सत्रात सायंकाळी 5 वाजता प्रा. ज्योती वाघमारे यांचे काश्मीर ते कन्याकुमारी मदतीचा हात एकनाथ, सायंकाळी 5.30 वाजता खासदार धैर्यशिल माने यांचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष विस्तार वाढीसाठी रुग्णसेवकांचे कर्तव्य जबाबदारी या विषयावर व्याख्यान होणार असुन सायंकाळी 6 वाजता रुग्ण केंद्रबिंदू मानुन संवेदनशिलता जपत रुग्णसेवा करणार्या पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णालयांचा व रुग्णसेवकांचा वैद्यकीय सेवा सन्मान करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष रामहरी राऊत व कोल्हापुर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे यांनी केले आहे.
शनिवारी होणार आदर्श शिक्षण संस्थांचा गौरव
एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेतर्फे शनिवार दिनांक 31 मे रोजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार व शिक्षक मेळावा होत आहे. येथे सुमारे पन्नास संस्थाचालकांना पुरस्कार वितरण होणार आहे. शाहू मार्केट यार्डजवळील लोटस हॉलमध्ये सकाळी 10 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचेहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख आरोग्यदूत मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगेश चिवटे विधान परिषदेच्या रिंगणात?
राज्यातील लाखो रुग्णांना वेदनेच्या प्रवासात मदतीचा हात देणारे मंगेश चिवटे यांची आमदार होण्याची इच्छा आता लपून राहिली नसून मंगेश चिवटे पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवसेना संस्था पुरस्कार आणि शिक्षक मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या उमेदवारीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.