news 87 lokman
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
news 87 lokman
No Result
View All Result

वारकरी संप्रदायाला काळीमा ! प्रसिद्ध कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार ; बेदम मारहाण करत लोखंडी पक्कड गरम करून दिले अंगावर चटके

टीम लोकमन by टीम लोकमन
March 16, 2026
in क्राईम
0
वारकरी संप्रदायाला काळीमा ! प्रसिद्ध कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार ; बेदम मारहाण करत लोखंडी पक्कड गरम करून दिले अंगावर चटके

टीम लोकमन अहिल्यानगर |

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरमधील ढवळपुरी गावात वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याच्यावर करण्यात येत आहे.

आरोपीने गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर वाईट नजर ठेवत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भोंदू महाराजाने पीडितेला बांबूने बेदम मारहाण करून लोखंडी पक्कड गरम करून अंगाला चटके दिल्याचा आरोप पीडितेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कीर्तनकार गुंजाळ महाराजाला अटक केली आहे.

मुलगी आठवीत असल्यापासून अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार पीडिता इयत्ता आठवीत असल्यापासून म्हणजे मुलगी 14 वर्षाची असल्यापासूनच हा प्रकार सुरू होता. आरोपी पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते. याचाच गैरफायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वाईट नजर ठेवली आणि तिच्यावर वारंवार जबरदस्ती केली. पीडितेने या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तिला बेदम मारहाण केली.

कुटूंबाला संपवण्याची दिली होती धमकी

आरोपीची शिक्षण संस्था असून पीडितेचा भाऊ त्याच्या संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेशी लगट केली व मुलगी घरी एकटी असताना त्याने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले. पीडितेने त्याला विरोध केल्यानंतर त्याने तिला धमकावले की, मी दोन हाफ मर्डर केले आहेत. कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन. कुटुंबाला काही होऊ नये म्हणून पीडितेने आरोपीकडून सातत्याने होणारा छळ मुकाट्याने सहन केला.

घरी बोलावून पिडीतेला दिले लोखंडी पक्कडीचे चटके

10 मार्च 2026 रोजी आरोपीने पीडितेला फोन करून स्वतःच्या घरी बोलावले आणि तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता तिथे गेली असता आरोपीने तिला एका रूममध्ये नेऊन बांबूने बेदम मारहाण केली आणि गॅसवर गरम केलेली लोखंडी पक्कड लावून तिला चटके दिले. त्यानंतर तिच्यावर बळजबरी केली. त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने 14 मार्च रोजी भावाकडे सर्व आपबिती कथन केली. त्यानंतर दोघांनी पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी यशवंत थोरात याला 15 मार्च रोजी पहाटे राहत्या घरातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून भोंदू महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Previous Post

कशी काळाची चाहूल आली ! कारची ट्रकला मागून जोरदार धडक, भीषण अपघातात 3 PSI जागीच ठार तर 2 PSI गंभीर जखमी ; मित्राच्या विवाह सोहळ्याला जात असताना काळाचा घाला

Next Post

सायकलवर जाऊन मरवडे येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची स्वच्छता ; प्रा. विनायक कलुबर्मे यांच्या संकल्पनेतून वारी परिवार सायकल क्लबचा कौतुकास्पद उपक्रम

Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

मानव जातीच्या अस्तित्वासाठी झाडांचे अस्तित्व टिकणे अत्यंत गरजेचे आहे म्हणून झाडाला आपलं म्हणून जपलं पाहिजे : कवी सुनील जवंजाळ

March 29, 2026
धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

धक्कादायक ! डॉक्टर असलेल्या पतीने आधी गळा दाबला आणि नंतर पन्नास किलोमीटर दूर जात पत्नीसह कारला लावली आग ; भयंकर हत्याकांड उघड झाल्याने सर्वत्र खळबळ

March 24, 2026
मोठी बातमी ! तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना काळाचा घाला, कोल्हापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

मोठी बातमी ! दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात टेंभुर्णी येथील शिक्षकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

March 23, 2026
मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

मोठी बातमी ! नामवंत शिक्षण सम्राट, भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन

March 22, 2026
news 87 lokman

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. News 87lokman या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

Don`t copy text!
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • राजकीय
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • लोकमन स्पेशल
  • सांगण्याजोगे
  • आरोग्य
  • सांस्कृतिक

© 2024 News87Lokman.
Powered by ContentOcean Infotech.

WhatsApp Group