टीम लोकमन मंगळवेढा |
ब्रह्मपुरी ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील शालन चंद्रकांत पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७० वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सचिन पाटील यांच्या मातोश्री तर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अर्जुनराव पाटील यांच्या भावजय होत. त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ब्रह्मपुरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












