टीम लोकमन मंगळवेढा |
शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित जिजामाता प्राथमिक शाळा शिशुविहार मंगळवेढा येथे शैक्षणिक वर्ष 2024 -25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. लहान मोठा गट व इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गासाठी मराठी व सेमी माध्यमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. जिजामाता शाळा मंगळवेढा शहरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी नावाजलेली शाळा आहे. विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी शाळा कठोर परिश्रम घेत आहे.
शाळेमध्ये दरवर्षी गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, गुणवत्ता विकासासाठी उपक्रम घेतले जातात. मर्यादित पटसंख्या हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. जिजामाता शाळेमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी उत्तमरीत्या करून घेतली जाते. स्पर्धा परीक्षा बरोबरच शैक्षणिक अभ्यासक्रम, सहशालेय उपक्रम देखील घेतले जातात. विद्यार्थ्यांना केवळ बौद्धिक ताण न देता विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून हसत खेळत शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो. मंगळवेढा मध्ये स्पर्धा परीक्षेतील मार्कांची जणू स्पर्धाच असते. परीक्षेत नंबर मिळवण्याच्या चढाओढीत विद्यार्थी हतबल झालेला दिसून येतो.
जिजामाता प्राथमिक शाळा केवळ स्पर्धा परीक्षेतील गुणांचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या गुणात्मक भावनात्मक व सर्वांगीण विकासाचा विचार करते. शाळेमधून अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी पुढे दहावी व बारावी परीक्षा बोर्ड मध्ये विभागीय व राज्य गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. शाळेचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कृषी विभाग, ग्रामसेवक, प्राध्यापक, तसेच विविध क्षेत्रात आपला नावलौकिक वाढवत आहेत.
शाळेचे संस्थापक प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, संस्थेचे सचिव अभिजीत ढोबळे यांनी शाळेला अद्यावत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. शाळेचा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आहे. शाळेच्या सर्व वर्ग खोल्या डिजिटल आहेत. शाळेमध्ये ई-लर्निंग सुविधा, प्रोजेक्टर आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कराटे, योगा, संगीत, कॉम्पुटर शिक्षणाची देखील सोय करण्यात आलेली आहे.
शाळेतील सर्व शिक्षक अतिशय तज्ञ, व कृतिशील आहेत. पालकांनी आपल्या मुलांचा प्रवेश जिजामाता शाळेत घेऊन मुलांच्या यशस्वी भविष्याची वाट सुकर करावी असे आवाहन मुख्याध्यापक प्रविण गुंड यांनी केले आहे.











